Fastest Train : सुसाट! देशात इथं धावली सर्वात वेगाने ट्रेन

Fastest Train : देशाच्या रेल्वे इतिहासात सर्वात वेगवान ट्रेनचा चॅप्टर लवकरच जोडल्या जाणार आहे. भारतातील सर्वात वेगवान रेल्वेने तिचा इच्छित टप्पा वेगाने गाठला. त्यामुळे सर्वांनीच आनंद साजरा केला. कोणत्या ठिकाणी सुरु आहे हा प्रयोग, महाराष्ट्रात धावणार का ही ट्रेन?

Fastest Train : सुसाट! देशात इथं धावली सर्वात वेगाने ट्रेन
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 6:35 PM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : देशाची पहिली वेगवान रेल्वे (Indian Railway) धावली. चाचणीत ती उत्तीर्ण झाली. त्यामुळे भारतात वेगवान प्रवासाचा नवीन अध्याय सुरु होणार आहे. रेल्वेतून झुकझुक नाही तर सुपरफास्ट प्रवास करता येईल. देशाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी दोन दिवसांचा लागणारा कालावधी अवघ्या काही तासांवर येईल. त्यादृष्टीने प्रयोग सुरु आहेत. देशाची पहिली रिजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (RRTS) कॉरिडोर दिल्ली ते मेरठ या दरम्यान तयार करण्यात आले आहे. रॅपिडएक्स ट्रेनची (RAPIDX) चाचणी घेण्यात आली. ट्रायल रनमध्ये ही रेल्वे सुसाट धावली. तिने इच्छित स्थळ अवघ्या काही मिनिटात गाठले. यामुळे ही देशातील सर्वात वेगवान रेल्वे ठरली. या रेल्वेचा वेग किती आहे, तिने किती मिनिटात अंतर पार केले, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील नाही?

17 किलोमीटर इतक्या मिनिटात

साहिबाबाद ते दुहाई डिपोपर्यंत या रॅपिडएक्स रेल्वेने सुसाट धाव घेतली. 17 किलोमीटरचे अंतर या ट्रेनने अवघ्या 12 मिनिटात पुर्ण केले. या ट्रॅकवर रॅपिडएक्स ट्रेन प्रति तास 160 किलोमीटरने धावली. ही ट्रेन प्रति तास 180 किमीने धावू शकते. ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. लवकरच साहिबाबाद-दुहाई सेक्शन जनतेसाठी सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रायल रन सुरु

नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या (NCRTC) अधिकाऱ्याने रॅपिडएक्सच्या ट्रायलची माहिती दिली. त्यानुसार सकाळी 6 ते रात्री 11 वाजे दरम्यान या ट्रेनची ट्रायल सुरु आहे. प्रत्येक 15 मिनिटांसाठी ही रेल्वे चालविण्यात येते. त्यामुळे त्यातील तांत्रिक दोष समोर येतात. सुधारणा करण्याचा अंदाज येतो.

कधी होईल प्रकल्प पूर्ण

हा प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडोर 82 किलोमीटर इतका लांब आहे. सर्वात वेगाने रॅपिडएक्स दिल्ली ते मेरठचे अंतर 60 मिनिटात कापेल. पण साहिदाबाद ते दुहाई डेपोपर्यंत प्रायोरिटी सेक्शन लवकर पूर्ण करण्यात येईल आणि ते सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात येतील. 17 किमी लांब या सेक्शनमध्ये पाच स्टेशन असतील. साहिबाबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डिपो ही ती स्थानकं आहेत.

कुठे कुठे तयार होत आहे कॉरिडोर

  • केंद्र सरकारच्या मेट्रो रेल सेफ्टी कमिशनरने साहिबाबाद-दुहाई डिपो सेक्शनवर रॅपिडएक्स ट्रेनो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. दिल्ली-मेरठ शिवाय दिल्ली-गुरुग्राम-एसएनबी-अलवर आणि दिल्ली-पानिपत या दरम्यान आरआरटीएस तयार करण्याची योजना आहे.
  • दिल्ली-गुरुग्राम-एसएनबी-अलवर या रेल्वे मार्गाला तीन टप्प्यात विकसीत करण्यात येईल. हे पूर्ण सेक्शन 107 किमी लांब आहे. नवी दिल्ली शेजारील अनेक उपनगरांमध्ये ही वेगवान रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या भागात वेगवान प्रवास करता येईल. देशातील इतर भागात वेगवान रेल्वेचा प्रयोग कधी करण्यात येईल, याची पूर्ण माहिती समोर आलेली नाही.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.