Income Tax Department : बापरे, भाजी विक्रेत्याला इतक्या कोटींची नोटीस!, आकडा पाहून येईल आकडी

Income Tax Department : जगात केव्हा काय घडेल काही सांगताच येत नाही. आता उत्तर प्रदेशातील या भाजीपाला विक्रेत्या, व्यापाऱ्याचं उदाहरण घ्या ना, पठ्ठ्या एका रात्रीतच अब्जाधीश झाल्याचे लक्षात येताच त्याला आयकर विभागाने इतक्या कोटींची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Income Tax Department : बापरे, भाजी विक्रेत्याला इतक्या कोटींची नोटीस!, आकडा पाहून येईल आकडी
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 4:45 PM

नवी दिल्ली : जगात केव्हा काय घडेल काही सांगताच येत नाही. आता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) या भाजीपाला विक्रेत्याचं उदाहरणच घ्या ना, काबाडकष्ट करुन घराचा गाडा हाकता हाकताना त्याला नाके नऊ आले आहे. घराचा खर्च भागवण्यासाठी, प्रपंच चालावा यासाठी त्याचे रोजचे रहाटगाडे चालू असताना, त्याच्या आयुष्यात आयकर विभागाच्या (Income Tax Department) एका नोटीसने (Notice) धुमाकूळ घातला. त्याला साधं ठाण्यातून बोलावणं आलं तरी कापरं भरत त्याला थेट आयकर खात्याने नोटीस ठोकली. त्याच्या खात्यात अब्जोंचा व्यवहार झाल्याचा नोटीसमध्ये दावा केल्याने या पठ्ठ्याचं तर चार गेले आणि पाच राहिले. भाजी विक्रेत्याने गैरमार्गाने अब्जावधींचा माया जमावल्याचा आरोप नोटीसमध्ये केल्याने भाजी विक्रेत्याची (Vegetable Vendor) तर झोप उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्हयातील सेवराई तालुक्यात ही घटना घडली आहे. गहमर गावातील या भाजी विक्रेत्याला स्वप्नातही कधी इनकम खाते त्याच्याकडे अशी काही विचारणा करेल, असे वाटले नसेल. आयकर खात्याने त्याला कर न भरल्याने नोटीस पाठवली आहे. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, त्याच्या खात्यात 1, 2 कोटी नव्हे तर 172 कोटी, 81 लाख, 59 हजार, 153 रुपये आले आहेत. व्यापाऱ्याला या सर्व प्रकारामुळे जबरदस्त धक्का बसला आहे. ही रक्कम आपली नसल्याचे सांगत त्याने हात वर केले आहे. तो बिचारा आता पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे.

त्याने उलट उत्तर प्रदेश पोलीसांकडे इनकम टॅक्स खात्याविरोधात दाद मागितली आहे. आपल्याला पोलिसांनी मदत करावी अशी भूमिका त्याने घेतली आहे. गावात आणि पंचक्रोशीत रोजचा भाजी विक्रेता अचानक एवढा श्रीमंत झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे भाजी विक्रेता सध्या चिंतेत आहे. एकतर एवढी मोठी कर थकविल्याची नोटीस आणि सगळीकडून त्याच्या नावाची चर्चा होत असल्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

हे सुद्धा वाचा

विनोद रस्तोगी असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. आधार कार्ड आणि पॅनकार्डचा गैरवापर करुन कोणीतरी परस्पर बँक खाते उघडले असून त्यात ही मोठी रक्कम जमा केल्याचा दावा रस्तोगी यांनी केला आहे. या खात्यात धनादेशाच्या माध्यमातून ही रक्कम जमा करण्यात आल्याचा दावा रस्तोगी यांनी केला. आयकर खात्याची नोटीस आल्यानंतर हा प्रकार आपल्याला कळल्याचा दावा भाजी विक्रेत्याने केला आहे. त्याने जिल्हा सायबर सेलकडे धाव घेतली आहे. हे खाते आपले नसून त्यातील भलमोठी रक्कमही आपली नसल्याचे त्याने सांगितले. प्रकरणात गहमर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पवन कुमार उपाध्याय हे प्रकरणात तपास करत आहे. त्यांनी हे प्रकरण संबंधित सायबर क्राईम सेलकडे पाठविल्याचे सांगितले.

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.