Uttarakhand CM Pushkar Singh Dhami:सीएम धामींच्या विजयाने विक्रम केला, मात्र इतिहासात असेही काही मुख्यमंत्री आहेत ज्यांचा दारूण पराभव झाला होता
शिबू सोरेन समर विधानसभेच्या जागेवरून पराभूत झाले होते. विशेष बाब म्हणजे त्यावेळी त्यांचा मुलगा हेंमत सोरोन हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांची लढत झारखंड पक्षाचे उमेदवार गोपाल कृष्ण पाटर यांच्याशी होती. तर सोरेन हे त्यावेळी 8000 मतांनी हारले होते.
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami) यांनी चंपावत विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या निर्मल गेहतोडी यांचा 54,212 मतांनी पराभव केला आहे. वास्तविक, भाजपने पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक (Assembly by-election) लढवली होती. यामध्ये भाजपला विजय मिळाला. मात्र, धामी स्वतः खतिमा यांच्याकडून निवडणूक हरले होते. असे असतानाही पक्षाने पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री पदावरच ठेवले. त्यानंतर त्यांनी चंपावत विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक (Champawat Assembly by-election) लढवली. या जागेवर 31 मे रोजी मतदान झाले होते. पण अशा ही पहिलीच निवडणूक नाही. भारताच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा अनेक मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे आता बोलूया त्या मुख्यमंत्र्यांबद्दल ज्यांना पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन
सर्वप्रथम झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्याबद्दल बोलूया, 2009 मध्ये झारखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी शिबू सोरेन यांना पोटनिवडणुकीत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवावी लागली होती. शिबू सोरेन समर विधानसभेच्या जागेवरून पराभूत झाले होते. विशेष बाब म्हणजे त्यावेळी त्यांचा मुलगा हेंमत सोरोन हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांची लढत झारखंड पक्षाचे उमेदवार गोपाल कृष्ण पाटर यांच्याशी होती. तर सोरेन हे त्यावेळी 8000 मतांनी हारले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या सात राजीनाम्यांची मागणी केली होती, त्यावर शिबू सोरेन म्हणाले होते की, मला माझा पराभव मान्य आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्रिभुवन नारायण सिंह
असेच एक नाव आहे त्रिभुवन नारायण सिंह यांचे. ज्यांना पोटनिवडणुकीत हरल्यानंतर भरलेल्या सभागृहात राजीनामा देण्याची घोषणा करावी लागली होती. त्रिभुवन नारायण सिंह यांनी १८ ऑक्टोंबर १९७० ला युपीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी ते कोणत्याच सदनाचे सदस्य नव्हते. त्यामुळे पुढील 6 महिन्यात कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे गरजेचे होते. अशा स्थितीत गोरखपूर जिल्ह्यातील मणिराम विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्रिभुवन नारायण सिंह यांची निवड करण्यात आली. त्यावेळी हिंदू महासभेचे नेते आणि गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ तिथून आमदार म्हणून निवडून आले होते. तर त्या पोटनिवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने रामकृष्ण द्विवेदी यांना त्रिभुवन सिंग यांच्या विरोधात उभे केले होते. त्रिभुवन नारायण सिंग यांचा 16 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर त्रिभुवन नारायण सिंह यांना 3 एप्रिल 1971 रोजी पूर्ण सभागृहाच्या समोर राजीनामा घोषित करावा लागला.