त्याच्यासोबत राह्यचंच नाही, मंगळसूत्रंही सोडून आले; कथा वाचकासोबत पळून गेलेल्या महिलेची पहिली प्रतिक्रिया
रामकथा वाचनासाठी आलेल्या कथाकाराच्या शिष्याने यजमानाची पत्नी पळवून नेल्याची घटना ताजीच आहे. याप्रकरणी पहिल्यांदाच त्या महिलेने प्रतिक्रिया दिली असून तिने पतीसह राहण्यास नकार दर्शवला आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातील छतरपूर येथे रामकथेची (Ramkatha) सांगता झाल्यानंतर निवेदकाच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीला (wife) पळवून नेले होते. ही घटना खूप गाजली होती. त्या यजमानाने याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र मयाप्रकरणी पहिल्यांदाच त्या महिलेने प्रतिक्रिया दिली आहे. त्या शिष्यासह पळून गेलेल्या महिलेने (woman) तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्या महिलेने सांगितले की, पती राहुल तिवारी आणि त्याचा साथीदार राहुल दुबे यांना तिला जीवानिशी मारायचे आहे.
सासर सोडून पळून गेलेली महिला म्हणाली, ‘ मी नरोत्तम दास यांच्यासोबत स्वेच्छेने आले आहे. मी माझ्या सासरच्या घरून काहीही आणले नाही. मी माझे मंगळसूत्रही तिथेच टाकून दिले. सासरच्या घरात माझा सतत छळ होत होता. त्यामुळेच आता मला माझ्या पतीसोबत राहायचे नाही आणि नरोत्तम दास यांच्यासोबत राहायचे आहे.’ असे तिने सांगितले आहे.
धीरेंद्र आचार्य यांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, या सर्व प्रकरणात निवेदक धीरेंद्र आचार्य यांनीही त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. नरोत्तम दास हे त्यांचे शिष्य नसून तो केवळ त्यांचे कामकाज पाहच होता, असे त्यांनी नमूदल केले. “ज्या दिवशी मला नरोत्तमच्या या कृत्याविषयी कळले, तेव्हापासून माझा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. आता तो माझ्यासोबत कधीही दिसणार नाही.”असे आचार्यांनी सांगितले.
ही प्रतिक्रिया ती महिला तसेच कथावाचक धीरेंद्र आचार्य यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमांपर्यंत पोहोचवली आहे.
पत्नीला घटस्फोट द्यायचा आहे आणि नरोत्तम वर कारवाई करा – पतीची मागणी
त्याचवेळी आता या संपूर्ण प्रकरणाचा बळी ठरलेला, यजमान राहुल तिवारी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. पोलिसांना अर्ज देण्यासोबतच पत्नीचा प्रियकर नरोत्तम दास याच्यावर कारवाई करण्याची त्याने मागणी केली आहे.
2021 पासून प्रेमप्रकरण सुरू झाले
खरंतर, या प्रकरणाची सुरुवात 2021 पासून झाली. जेव्हा महिलेचे पती राहुल तिवारी यांनी गौरीशंकर मंदिरात रामकथेचे आयोजन केले होते. चित्रकूटचे कथाकार धीरेंद्र आचार्य यांना कथा वाचनासाठी बोलावण्यात आले. आचार्य त्यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे यांच्यासोबत रामकथेचे वाचन करण्यासाठी आले होते.
या प्रकरणी पती राहुल यांनी असा आरोप केला की, कथा वाचनादरम्यान त्यांच्या पत्नीला नरोत्तम दास दुबे याने त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आणि त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन दोघांनी बोलणे सुरू केले. 5 एप्रिल रोजी नरोत्तमने राहूल यांच्या पत्नीला पळवून नेले.
पतीसोबत राहण्यास दिला स्पष्ट नकार
याप्रकरणी त्या महिलेच्या पतीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्या महिलेचा शोधही सुरू केला. महिन्याभरानंतर जेव्हा फिर्यादीची पत्नी सापडली, तेव्हा पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून जबाब घेतला. पण, आश्चर्याची बाब म्हणजे तेव्हा त्या महिलेने पतीसोबत राहण्यास सरळ नकार दिला. रोत्तम दास दुबे यांच्यासोबतच आपल्याला रहायचे आहे, अशी इच्छा त्या महिलेने व्यक्त केली. आता महिलेने सासरच्या मंडळींवर छळ केल्याचा आरोप केला आहे.