Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी, जाणून घ्या कधीपासून लागू होणार

Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक अर्थात नारी शक्ति वंदन अधिनियमला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या विधेयक आता पूर्णत्वास आलं आहे. पण हे विधेयक कधीपासून लागू होणार आणि काय आहे खासियत ते जाणून घ्या

Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी, जाणून घ्या कधीपासून लागू होणार
Womens Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 11:13 PM

मुंबई : महिला आरक्षण विधेयकाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक पास झालं होतं. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक बहुमताने पास झालं. त्यानंतर हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राष्ट्पती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं. अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता या विधेयकाला कायद्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी मिळताच केंद्र सरकारने एक गॅझेट नोटिफिकेशन जारी केलं आहे. या विधेयकाला ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ असं संबोधलं जाणार आहे. आता अनुच्छेद 334 ए च्या माध्यमातून संविधान सहभागी केलं जाणार आहे. या कायद्याच्या माध्यमातून लोकसबा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे.

हे विधेयक 20 सप्टेंबरला लोकसभेत आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेत मांडण्यात आलं होतं. लोकसभेत या विधेयकाच्या बाजून 454 मतं पडली होती. फक्त दोन खासदारांनी या विधेयकाचा विरोध केला होता. तर राज्यसभेत बिल मांडलं तेव्हा 214 खासदार उपस्थित होते. त्या सर्वांनी विधेयकाच्या पक्षात मतं टाकली. त्यानंतर हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं होतं.

हा कायदा कधीपासून लागू होणार

महिला आरक्षण विधेयकाची मागणी गेल्या 27 वर्षांपासून होत होती. आता या कायद्यामुळे संसद आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांमधील एक तृतीयांश जागा एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या महिलांसाठी आरक्षित असतील.

आरक्षित जागा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वेगवेगळ्या क्षेत्रानुसार रोटेशन पद्धतीने लागू केल्या जातील. महिलांसाठीच्या जागेसाठीचं आरक्षण 15 वर्षांसाठी असणार आहे. ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ कायदा प्रत्यक्षात कधी अंमलात येईल याबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

विधेयकातील तरतुदीनुसार लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीनंतर आरक्षित जागा रोटेड केली जाईल. 2024 लोकसभा निवडणुकीत हे विधेयक लागू पडणार नाही. पुढची जनगणना आणि जागांचं परिसीमन झाल्यानंतरच हे विधेयक लागू होईल.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.