मोदी है तो मुमकीन है! सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे. या निकालानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

मोदी है तो मुमकीन है! सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांचे आभार मानले
Follow us
| Updated on: Jul 17, 2019 | 7:06 PM

हेग, नेदरलँड : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिलाय. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे. या निकालानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

कोणताही खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर नेणं हे धाडसाचं पाऊल समजलं जातं. भारताने कुलभूषण जाधव यांच्यासाठी आयसीजेमध्ये धाव घेतली आणि दिग्गज वकील हरिश साळवे यांच्यामार्फत बाजू मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याची बाजू भारताने लावून धरली होती. याच मुद्द्यावर भारताने विजय मिळवला. आयसीजेमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सुषमा स्वराज यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींसोबतच सुषमा स्वराज यांनी हरिश साळवे यांचंही अभिनंदन केलंय. हरिश साळवे यांनी पाकिस्तानचा प्रत्येक युक्तीवाद खोडून काढत प्रभावीपणे बाजू मांडली होती. त्यामुळेच भारताचा हा विजय झाला. या निकालामुळे कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.

सुषमा स्वराज यांचे वैयक्तिक पातळीवर प्रयत्न

परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला 16 पत्र लिहून कुलभूषण जाधव यांच्यासाठी कौन्सिलर एक्सिसची मागणी केली होती. पण पाकिस्तानने एकाही पत्राला उत्तर दिलं नाही. शिवाय कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी यांची भेट घालून देण्याचं महत्त्वाचं काम सुषमा स्वराज यांनी केलं होतं. या प्रत्येक घडामोडीवर स्वतः लक्ष ठेवून भारताकडून हा मुद्दा प्रभावीपणे कसा लावून धरला जाईल यासाठी सुषमा स्वराज यांनी प्रयत्न केले.

आता पुढे काय?

पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झाल्यामुळे भारतासाठी आता पुढील मार्ग सोपा झालाय. कारण, पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या फाशीवर आयसीजेने स्थगिती कायम ठेवली आहे. कौन्सिलर एक्सेस दिल्यानंतरच या फाशीवर पुनर्विचार केला जाईल, असं कोर्टाने स्पष्ट केलंय. त्यामुळे भारताला आता राजनैतिक मदत करत हा खटला लढवता येईल.

फाशीला स्थगिती

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा नकार दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे 18 मे 2017 रोजी कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.