Holi 2023 |भारतात अशी गावं आहेत, जेथे 100 ते 150 वर्षापासून होळी साजरी केली जात नाही, कारण

होळी-धुळवडीची वाट लोक अनेक दिवसांपासून पहात असतात. प्रत्येक होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण देशात काही ठिकाणी होळी खेळलीच जात नाही.

Holi 2023 |भारतात अशी गावं आहेत, जेथे 100 ते 150 वर्षापासून होळी साजरी केली जात नाही, कारण
HOLIImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 7:38 AM

जयपूर : रंगांचा उत्सव म्हणजे होळी देशभरात अत्यंत पारंपारिक उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. या वर्षी 8 मार्चला देशभर होळी ( holifestival2023 ) मोठ्या दणक्यात साजरी होणार आहे. दुसरीकडे देशात अशी काही ठिकाणेही आहेत जिथे होळी साजरी केली जात नाही. हे ऐकूण तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले. परंतू ही गोष्ट एकदम खरी आहे. या ठिकाणी होळी साजरी न करण्याची कारणे देखील तुम्हाला थोडी विचित्र वाटू शकतील ! चला पाहूया येथे का खेळली जात नाही होळी..

उत्तराखंडच्या या गावात होळी साजरी होत नाही

उत्तराखंडच्या क्वीली, कुरझण आणि जौंदली गावांत दीडशे वर्षांपासून होळी खेळली जात नाही. ही गावे रूद्रप्रयाग आणि अगस्त्यमुनी ब्लॉक मध्ये येतात. या ठिकाणी होळी साजरी न करण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. या गावाची इष्ट देवता मॉं त्रिपूर सुंदरी देवी आहे. या देवीला गोंधळ आणि धागडधिंगा पसंद नाही. या गावात दीडशे वर्षांपूर्वी लोकांनी होळी साजरी करण्याचा प्रयत्न केला तर गावात कॉलराची साथ पसरली. या घटनेनंतर या गावातील लोकांनी होळी साजरी करण्याचा कधी प्रयत्न केला नाही.

झारखंडच्या गावांत शंभर वर्षांपासून होळी केली जात नाही..

झारखंडच्या बोकारोच्या कसमार ब्लॉकजवळील दुर्गापूर गावात गेल्या 100 वर्षांपासून होळीचा सण साजरा केला जात नाही. यामागे देखील एक घटना जबाबदार आहे. वास्तविक येथे काही एका शतकापूर्वी एका राजाच्या मुलाचा होळीच्या दिवशी मृत्यू झाला. यानंतर गावात कधी होळी केली तर महामारी पसरून अनेक जणांचा मृत्यू होत असे. त्यानंतर राजाने आदेश दिला की यापुढे येथे कोणी होळी साजरी करायची नाही. तेव्हापासून आतापर्यंत सगळे या आदेशाचे पालन करीत आहेत. येथील लोकांचे मानने आहे की जर त्यांनी एकमेकांना रंग लावला तर गावात महामारी आणि भीषण संकट येईल.

गुजरातच्या या गावात २०० वर्षे होळी होत नाही

गुजरातच्या रामसन गावाला संतांचा शाप लागला आहे. येथील राजाने संताशी वाईट व्यवहार केल्याने हा शाप मिळाला, तेव्हापासून होळी करण्यास लोक भित आहेत.

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याच्या मुलताई तहसीलच्या डहुआ गावात 125 वर्षांपूर्वी गावचे प्रमुख बावडी बुडून मेले. त्यानंतर येथे होळी कोणी खेळत नाही.

हरियानातील या गावाला शाप

हरियानाच्या कैथलच्या गुहल्ला चीका येथील गावात दीडशे वर्षांपूर्वी एक बुटके बाबा रहात होते. होळीला त्यांच्या उंचीवरून त्यांना चिडवले. त्यामुळे त्यांनी होळीत उडी मारून आत्महत्या केली. त्यानी शाप दिल्याने कोणी होळी खेळत नाही.

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील खरहरी गावात दीडशे वर्षांपूर्वी आग लागली होती, त्यानंतर येथे महामारी आली, गावातील वैदू बाबाच्या स्वप्नात देवीने दर्शन देत होळी साजरी न करण्यास सांगितले. येथील धमनागुडी गावात देवी कोप झाल्याने दोनशे वर्षे कोणी होळी करत नाही.

उत्तर प्रदेश कुंडरा गावात मेमार सिंह याची डाकूनी होळीलाच हत्या केली. त्यानंतर पुरूषांनी होळी खेळणे बंद केले, महिलांना मात्र होळी खेळण्यास परवानगी आहे. येथे होळीला पुरूष शेतात जाऊन बसतात.

तामिळनाडून या दिवसाला पवित्र मानतात

दक्षिण भारतात उत्तरेतील अनेक प्रथा पाळल्या जात नाहीत. तमिळ लोक मासी मागम साजरा करतात, या दिवशी आकाशातील जीव आणि पूर्वज पवित्र नदी, तलाव आणि पाण्यात डुबकी मारण्यासाठी धरतीवर उतरत असतात त्यामुळे होळी खेळत नाहीत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.