‘मला तू म्हणणारा कोणीच राहिला नाही,मित्रांना बोलावले तर…,’ काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

काही मोठे करायचे असेल तर रिस्क घ्यावी लागते. माझी जी रिस्क घेण्याची क्षमता आहे .त्याचा अजूनही पूर्ण रुपाने वापर झालेला नाही असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका या पॉडकास्टमध्ये म्हणाले.

'मला तू म्हणणारा कोणीच राहिला नाही,मित्रांना बोलावले तर...,' काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 10:46 PM

दोस्त प्रत्येक वयात बनतात.परंतू लहानपणीचे मित्र, हेच खरे मित्र असतात.वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी पॉडकास्टवर शेअर केल्या आहेत शेअर ट्रेंडिंग एप झेरोधाचे संस्थापक निखिल कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत एका पॉडकास्टवर घेतली आहे. निखिल कामत यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या बालपणाबद्दलचे अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यावेळी पीएम मोदी खूपच भावूक झाले.

या पॉडकास्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ते म्हणाले की दोस्त प्रत्येकाला हवा असतो. पंतप्रधान म्हणाले की पीएम असो वा सीएम, दोस्त तर प्रत्येकाला हवा, तोही लहानपणीचा.. असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांना निखिल कामत यांनी प्रश्न केला की तुम्ही विद्यार्थी असताना अभ्यासात कसे होता ? पंतप्रधान मोदी यांनी कोणतेही आढे ओढे न घेता सांगितले की मी लहानपणी सामान्य विद्यार्थी होतो. कोणत्याही प्रकारे नोटीस करावे असे माझ्याकडे काहीही नव्हते. परंतू माझे एक शिक्षक होते. बिरजी भाई चौधरी त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या.

हे सुद्धा वाचा

पीएम मोदी म्हणाले की “बिरजी भाई चौधरी एक दिवस माझ्या वडिलांना भेटायला आले. आणि म्हणाले की याच्या आत खूपच टॅलेंट आहे. प्रत्येक गोष्ट लवकर कॅच करतो. परंतू लक्ष केंद्रीत करत नाही. आणि आपल्या विश्वात मग्न होऊन जातो.”

स्पर्धेच्या अभ्यासापासून दूर पळायचे

मी कॉम्पिटीशन वाल्या अभ्यासापासून दूर पळायचो. जास्त अभ्यास करणे टाळायचो मनात वाटयचे अशी परीक्षा पास करावी, परंतू इतर एक्टीव्हिटीमध्ये भाग घ्यायचो. नवीन गोष्टी पटकन शिकायचो.

तुम्ही लहानपणीच्या मित्रांच्या टच मध्ये आहात काय ? या प्रश्नावर मोदी बालपणाच्या दिवसात हरवले, ते म्हणाले की माझी केस थोडी विचित्र आहे. खूप लहान वयात मी घर सोडले होते. घर म्हणजे सर्वकाही सोडले होते. कोणाशी काही संपर्क नव्हता. खूप मोठा गॅप पडला.कोणाशी काही घेणे देणे नव्हते. मला वाटायचे कोणी मला का विचारेल. माझे जीवन एका भटकत्या माणसासारखे झाले होते.

जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या अनेक इच्छा जागृत झाल्या. माझे एक इच्छा होती की सगळ्या वर्गमित्रांना सीएम हाऊसला बोलवावे. त्यामागे माझा हेतू असा होता की कोणी मला असे बोलू नये की आता मुख्यमंत्री झाला…मोठा माणूस झाला आहे. तीस मार खान बनला आहे. मी त्यांना सांगू इच्छीत होतो की आहे तसाच आहे.जो गाव सोडून गेलेला. मी लहानपणीचे ते क्षण जगू इच्छीत होतो.त्या मित्रांना भेटू इच्छीत होतो. परंतू ते खूपच वयस्कर झाले होते. सगळ्यांची मुले खूप मोठी झाली होती. सगळ्यांची केस पिकले होते. त्यामुळे त्यांना मी ओळख शकलो नाही.’

मी सर्वांना बोलावले, एकूण ३० ते ३५ मित्र आले. सर्वांनी रात्री जेवण घेतले. गप्पा मारल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला.परंतू मला जास्त आनंद झाला नाही, कारण मी दोस्त शोधत होतो. परंतू चे सर्व जण माझ्याशी आदराने बोलत होते. त्यांना मी मुख्यमंत्री दिसते होतो. तरी दरी भरली नाही. आणि माझ्या जीवनात शायद आता तू म्हणणारा उरला नाही. तरीही काही लोक शिल्लक आहेत. पण ते आदराने बोलत होते. एक होते रासबिहारी मनियार…ते नेहमी चिट्टी लिहायचे. त्यात ते मला तू म्हणायचे. त्यांचे अलिकडेच ९३ ते ९४ वयात निधन झाले. तेच मला तू म्हणून लिहीत होते.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.