या ट्रेनच्या प्रवासासाठी तिकीटच लागत नाही, फ्रीमध्ये होतो प्रवास, काय आहे ट्रेनचे नाव ?

तुम्हाला जर या विनातिकीट ट्रेनच्या प्रवासाची मजा घ्यायची असेल आणि नैसर्गिक सौदर्याचा आनंद घ्यायचा असाल तर देशात एका निसर्गरम्य ठिकाणी तुमचे स्वागत आहे. येथे तुम्हाला तिकीट काढण्याची काही झंझट राहणार नाही आणि टीसीची देखील भीती राहणार नाही.

या ट्रेनच्या प्रवासासाठी तिकीटच लागत नाही, फ्रीमध्ये होतो प्रवास, काय आहे ट्रेनचे नाव ?
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 4:50 PM

ट्रेनचा प्रवास करताना आपल्याला तिकीट विकत घ्यावेच लागते. विनातिकीट प्रवास केला तर आपल्या टीसी पकडण्याची भीती असते. आणि टीसीने पकडल्यानंतर आपल्याला दंड भरावा लागतो. परंतू देशात एक अशी ट्रेन आहे जिचा प्रवास करताना आपल्याला तिकीट काढावेच लागत नाही. त्यामुळे आपल्याला टीसीच्या भीतीविना बिनधास्त प्रवास करता येतो. तेही अधिकृतरित्या. चला तर पाहूयात कोणती अशी ट्रेन आहे जी मोफत प्रवास घडवते…

७५ वर्षांपासून मोफत प्रवास

मोफत प्रवास घडविणारी ही ट्रेन पंजाब आणि हिमाचल प्रदेश दरम्यान धावते.आणि या ट्रेनला भाक्रानांगल ट्रेन नावाने देखील ओळखली जाते. ही ट्रेन गेल्या ७५ वर्षांपासून प्रवाशांकडे कोणी भाडे न घेता सेवा देत आहे. १३ किलोमीटरचा हा प्रवास मोफत घडवित आहे.

तीन बोगदे आणि सहा स्थानके भाक्रा नागंल ट्रेनचा मार्ग खुपच सुंदर आहे. ही ट्रेन सतलज नदी पार करीत शिवालिक पर्वतांच्या मधून प्रवास करते. ही ट्रेन तेरा किलोमीटरचा प्रवास करताना तीन बोगदे आणि सहा स्थानकांचा प्रवास करते. त्यामुळे प्रवाशांना अनोखा नयनरम्य प्रवासाचा आनंद मिळतो.

हे सुद्धा वाचा

लाकडी कोच आणि ऐतिहासिक आसने

या ट्रेनला केवळ तीन कोच आहेत. ट्रेनला लाकडाचे कोच बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कोचला बसवलेली आसने इंग्रजांच्या काळातील आहेत, त्यांना आजही सुरक्षित सांभाळून ठेवण्यात आले आहे. ही ट्रेन जेव्हा सुरु झाली तेव्हा तिला वाफेच्या इंजिनाने चालविले जात होते. साल १९५३ मध्ये या ट्रेनाला डिझेल इंजिन लावण्यात आले आणि तेव्हा पासून ही ट्रेन डिझेलच्या इंजिनावर धावते.

भाक्रा-नांगल डॅमशी संबंध

१९४८ मध्ये जेव्हा भाक्रा नांगल डॅमची निर्मिती सुरु झाली तेव्हा या ट्रेनला मजूर आणि निर्मिती साहित्यांच्या वाहतूकीसाठी सुरु केले गेले. ही ट्रेन भाक्रा मॅनेजमेंट बोर्डाच्या ताब्यात आहे. भारतीय रेल्वेशी आता तिचा काही संबंध नाही. जेव्हा डॅमचे काम पूर्ण झाले तेव्हा या ट्रेनला बंद करण्याऐवजी हीला पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या मदतीसाठी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. ८०० प्रवासी प्रवास करतात

आज देखील भांक्रा नांगल ट्रेनमधून रोज सुमारे ८०० प्रवासी प्रवास करतात. ही ट्रेन पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र तर आहेच शिवाय स्थानिक लोक देखील यातून मोफत प्रवास करतात. जे पर्यटक हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्याच्या नैसर्गिक सौदर्य पाहू इच्छीतात त्यांच्यासाठी हा एक शानदार पर्याय आहे. सतलज नदी, शिवालिक पर्वत रांगातून प्रवास करणे म्हणजे प्रवाशांना स्वर्ग सुखासारखे वाटते.

इतिहास आणि वारसा

भाक्रा-नागंल ट्रेन केवळ एक वाहतूकीचे साधन नाही. तर देशातील एक वारसा आहे. या ट्रेनमुळे त्याकाळातील कोच, इंजिन आणि मार्ग यातून आपल्याला त्या काळाती आठवणी जागृत होतात. ज्या काळात देशात मोठ मोठी धरणे आणि योजनांची सुरुवात झाली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.