Toll Plaza : टोल नाक्यापासून मुक्ती, आता कुठलाच नाही थांबा! GNSS तंत्रज्ञान आहे तरी काय
Toll Plaza : टोल नाक्यापासून वाहनधारकांची लवकरच सूटका होणार आहे. पण टोलपासून त्यांची मुक्ती होणार नाही. त्यांना टोल भरावा लागेल. पण त्यासाठी त्यांना टोल नाक्यांवर थांबण्याची गरज नाही. काय आहे GNSS तंत्रज्ञान?
नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : देशातील रस्त्यांचे जाळेच नाही तर रस्ते पण मजबूत झाले आहेत. नवीन एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग, ग्रीन कॅरिडोअरमुळे वाहनधारकांना झटपट देशातील एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहचता येऊ लागले आहे. पण त्यासाठी अनेकांना टोल चुकता करावा लागत आहे. फास्टटॅगच्या ( FASTag) मदतीने टोल नाक्यावर मुंगीसारखी सरकणारी वाहनं आता गतीने टोल नाके ओलांडत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले होते. आता या टोल नाक्यापासून (Toll Plaza)वाहनधारकांची लवकरच सूटका होणार आहे. पण टोलपासून त्यांची मुक्ती होणार नाही. त्यांना टोल भरावा लागेल. पण त्यासाठी त्यांना टोल नाक्यांवर थांबण्याची गरज नाही. काय आहे GNSS तंत्रज्ञान?
वेळेची मोठी बचत
राज्यसभेत शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. टोल प्लाझावरील वेळेत मोठी बचत झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिक्षा कालावधीत कपात झाल्याचा दावा त्यांनी केला. पूर्वी टोलनाक्यावर वाहनधारकांना सरासरी 734 सेकंद लागत होते. आता हा कालावधी घटून केवळ 47 सेकंदावर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर FASTag लावल्यामुळे हा बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.
आता तर थांबण्याची नाही गरज
पण आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल नाकेच गायब होणार आहे. वाहनधारकांना टोल नाक्यावर थांबण्याची गरज नसेल. त्यांना सूसाट धावता येईल. टोलनाक्यांवर थांबण्याची गरज नसली तरी वाहनधारकांच्या खात्यातून टोल कपात होईल. पण वाहनधारकांना ट्रॅफिक जाममध्ये अडकण्याची भीती राहणार नाही.
काय आहे GNSS तंत्रज्ञान
देशात लवकरच Global Navigation Satellite System (GNSS) बसविण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून टोल नाक्यावर थांबण्याची काहीच गरज राहणार नाही. वाहनधारकांना एक सेकंद पण टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. या योजनेसाठी केंद्र सरकारने एक सल्लागाराची पण नियुक्ती केली आहे.
FASTag मुळे वेळेची बचत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag मुळे टोल प्लाझावर वाहनधारकांना आता जास्तवेळ थांबावे लागत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) यासंबंधी एक सर्वे केला होता. त्यात ही बाब समोर आली होती. पूर्वी टोलनाक्यावर वाहनधारकांना सरासरी 734 सेकंद लागत होते. आता हा कालावधी घटून केवळ 47 सेकंदावर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर FASTag लावल्यामुळे हा बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे नवीन तंत्रज्ञान
यामध्ये दोन तंत्रज्ञान आहे. पहिले तंत्रज्ञान आहे, वाहनातील जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीवर आधारीत. या तंत्रज्ञानाने महामार्गावरील सॅटेलाइटद्वारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून थेट टोलचे पैसे कापण्यात येतील. तर दुसरे तंत्रज्ञान हे नंबर प्लेटवर आधारीत आहे. नंबर प्लेटवर टोलसाठी संगणकीकृत प्रणाली असेल जी सॉफ्टवेअरच्या मदतीने टोल वसूल करण्यास मदत करेल. या तंत्रात महामार्गावर वाहन कोणत्या पॉईंटवरून प्रवेश करेल, त्याची माहिती नोंदवली जाईल. यानंतर महामार्गावरून गाडी ज्या पॉईंटवर जाईल, तिथेही त्याची नोंदणी केली जाईल. या दरम्यान, महामार्गावर वाहन किती किलोमीटर चालले त्याआधारे वाहन मालकाच्या बँक खात्यातून टोल कापत होईल.