हे पहिल्यांदाच घडतंय : केरळमध्ये लॉकडाऊन पाळणाऱ्याला सोनं बक्षीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडत आहेत. याच घटनांचा घेतलेला एक आढावा (Corona Effect in World).

हे पहिल्यांदाच घडतंय : केरळमध्ये लॉकडाऊन पाळणाऱ्याला सोनं बक्षीस
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 12:20 AM

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरुच आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच इतरही अनेक मोठे बदल जगभरात पाहायला मिळत आहेत. एकूणच जगभरात उलथापालथ झाल्याचं दिसत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. काही देशांनी वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडत आहेत. याच घटनांचा घेतलेला एक आढावा (Corona Effect in World).

1. केरळमधील एका गावात लॉकडाऊनचं पालन केलं, तर बक्षीस म्हणून चक्क सोनं मिळणार आहे. केरळच्या मल्लमपूरम जिल्ह्यातील एका गावात ग्रामपंचायतीनं ही अनोखी शक्कल लढवली आहे. पहिल्या विजेत्याला सोनं, दुसऱ्या विजेत्याला फ्रिज आणि तिसऱ्या विजेत्याला वॉशिंग-मशिन असे वेगवेगळे 50 बक्षीसं दिली जाणार आहेत. ग्रामपंचायतीचे सदस्य गावकऱ्यांवर बारीक नजर ठेवून आहेत. कुणीही जर बाहेर आढळला, तर तो स्पर्धेतून बाद होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

2. चीनमध्ये आता फक्त रस्त्यांवरच नाही, तर अनेक ठिकाणी चक्क घरांमध्येच कॅमेरे लावले जात आहेत. क्वारंटाईन असलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार काही घरांच्या दारांवर तर काही ठिकाणी थेट घरांमध्येच कॅमेरे बसवले जाणार आहेत. एका माहितीनुसार चीनमध्ये संपूर्ण देशात तब्बल 35 कोटी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हा आकडा अमेरिकेतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापेक्षा 5 पट जास्त आहे.

3. स्कॉटलंडमध्ये 13 मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या 13 मुलांसोबत घराची पूर्ण जबाबदारी आता एकट्या आईवर आली आहे. मुलांचे वडिल एका दवाखान्यात आरोग्य कर्मचारी आहेत. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या अनोख्या कुटुंबाची स्टोरी व्हायरल झाली आहे. बीबीसीनं ही बातमी दिलीय.

4. केनियात पोलिसांच्या गोळीबारात बाल्कनीत उभ्या असलेल्या 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. केनियात सक्तीनं कर्फ्यूची अंमलबजावणी केली जात आहे. त्यादरम्यान नैरोबी शहरात एक कुटुंब आपल्या बाल्कनीत उभं होतं. मात्र त्यांना पाहताच एका पोलिसानं गोळीबार केला. यात एका मुलाच्या पोटाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. आपण कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नव्हतं, असं कुटुंबाने म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबाराविरोधात तेथे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे.

5. कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची यादी वाचता-वाचता एका आरोग्य अधिकाऱ्याला अश्रू अनावर झाले. स्पेनमध्ये ही घटना घडली. दिवसभरात कोरोनामुळे काय-काय घडलं याची माहिती ही महिला पत्रकार परिषदेत देत होती. मात्र त्याचदरम्यान महिलेच्या भावनांचा बांध फुटला. तिला अश्रू अनावर झाले. स्पेनमध्ये 2 लाखांहून जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 23 हजारांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

6. कोरोनाच्या फैलावानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे पहिल्यांदाच उघडले गेले. 5 ते 10 लोकांच्या उपस्थितीत आज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडले गेले. एका माहितीनुसार मंदिराचे मुख्य पुजारी सुद्धा सध्या क्वारंटाईन आहेत. बर्फवृष्टीमुळे केदारनाथाचं मंदिर वर्षातून 6 महिने बंद राहतं. गेल्या वर्षी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर 3 हजार लोकांनी दर्शन घेतलं होतं. यावेळी मात्र फक्त 5 ते 10 लोक उपस्थित होते.

7. 2020 हे साल सर्वाधिक तापमानाचं वर्ष ठरु शकतं, असा अंदाज शास्रज्ञांनी वर्तवला आहे. लॉकडाऊनमुळे आभाळ स्वच्छ आणि हवेतलं प्रदूषण सुद्धा घटलंय. मात्र तरी यंदा तापमानाचे नवे रेकॉर्ड तयार होण्याचा दावा केला जातोय. याआधी 2016 हे वर्ष सर्वाधिक तापमानाचं वर्ष म्हणून गणलं गेलं होतं. डेलीमेलनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

8. एका मुलासाठी भारतीय रेल्वेनं तब्बल 1500 किलोमीटर लांब 1 लीटर दूध पोहोचवलं आहे. अनेक भागात अजूनही उपचार म्हणून उंटणीचं दूध वापरलं जातं. मात्र लॉकडाऊनमुळे सिंकदराबादमधील कुटुंबापुढे अडचण उभी राहिली. मुलाच्या वडिलांनी तिथल्या एका रेल्वे अधिकाऱ्याला अडचण सांगितली. त्या अधिकाऱ्यानं लगेच पावलं उचलत मुंबईच्या अधिकाऱ्याला फोन केला. त्यानंतर लुधियानाहून मालवाहतुकीच्या रेल्वेनं वांद्रे स्टेशनवर दूध आणलं गेलं. वांद्रेहून ते सिंकदराबादला पाठवलं गेलं.

9. लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ गेम बनवणाऱ्या इंडस्ट्रीला रेकॉर्डब्रेक फायदा झालाय. ऑनलाईन मल्टिप्लेयरच्या रुपात लाखो लोक व्हिडीओ गेम खेळण्यात व्यस्त आहेत. नई दुनियाच्या एका बातमीनुसार त्यामुळे व्हिडीओ गेमच्या एकूण व्यापारात 11 टक्क्यानं वाढ झाली आहे. त्याबरोबरच मोबाईलमधून गेम खेळणाऱ्यांच्या संख्येतही 15 टक्के वाढ झाल्याची माहिती आहे.

10. कोरोनामुळे आता जागतिक चित्रपट महोत्सव सु्द्धा ऑनलाईन होणार आहे. ट्रिबेका इंटरप्राइजेस आणि यूट्यूब यांनी एकत्र येऊन या महोत्सवाचं आयोजन केलंय. महत्वाचं म्हणजे त्याचं स्ट्रिमिंग हे मोफत असणार आहे. मात्र कोरोनाच्या लढ्यात जागतिक आरोग्य संघटेला मदत करण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. कान्स, व्हेनिस, टोरंटो, मुंबई, सिडनी, टोकियो, लंडन, जेरुसलेम आदी चित्रपट महोत्सवांचे आयोजक ‘ऑनलाइन फ्लॅटफॉर्म’वर सहभागी होणार आहेत.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Corona Virus : न्यूझीलंडमध्ये सलग दुसऱ्यांदा आणीबाणीच्या कालावधीत वाढ, कोरोनामुळे जगात ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

जगभरात 82 कोटीहून अधिक लोक उपाशी पोटी, कोरोनामुळे घडणाऱ्या ‘या’ 11 घटनांनी जगभरात उलथापालथ

Corona Effect in World

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.