गर्लफ्रेन्डसाठी 74 वर्षांचा बॉयफ्रेन्ड रिक्षा चालवतो! इंग्लिश प्रोफेसर असलेला हा माणूस असं का करतोय नेमकं?

पवईतील एका प्रतिष्ठीत कॉलेमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या या प्रोफेसरनं 20 वर्ष काम केलं. 60 व्या वर्षी ते रियाटर्ड झाले आणि कर्नाटकात परतले.

गर्लफ्रेन्डसाठी 74 वर्षांचा बॉयफ्रेन्ड रिक्षा चालवतो! इंग्लिश प्रोफेसर असलेला हा माणूस असं का करतोय नेमकं?
रिक्षावाला असलेल्या या इंग्रजी प्रोफेसरची गोष्ट भारीचए!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 3:38 PM

मुंबई : निवृत्त शिक्षक (Retired professor) आपल्या उरलेल्या आयुष्यात काय करत असतील? रिक्षा (Auto Rikshaw Driver) तर नक्कीच चालवत नसतील ना? बहुतांश लोक म्हणतील ते रिक्षा तर नक्कीच चालवणार नाही. आता इंग्रजी (English Language) सारखा विषय अनेकांना कठीण वाटतो. त्यात इंग्रजीच्या प्रोफेसरबाबत तर अनेकांना कुतूहल वाटतं. आता नुकतीच एक इंटरेस्टिंग व्यक्ती सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. ही व्यक्ती इंग्रजीची प्रोफेसर होती. इंग्रजी शिकवणारी ही व्यक्ती वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झाली. त्यानंतर आता गेली 14 वर्ष ही व्यक्ती रिक्षा चालवण्याचं काम करतेय. अर्थात कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतंच! पण तरिही एखादा प्रोफेसरवर रिक्षा चालवण्यासारखी वेळ येणं, हे थोडंसी अजबच आहे की नाही? अर्थात म्हणून या रिक्षा चालक कम रिटायर्ड इंग्लिश प्रोफसरची चर्चा सध्या रंगली आहे. हा प्रोफेसर नेमका रिक्षा चालक का झाला? तो नेमकी रिक्षा कुठे चालवतो? या रिक्षा चालकाची प्रोफेसर असण्याची ओळक नेमकी झाली तरी कुणाला आणि कशी? याचाही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे.

कशी झाली ओळख?

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार एक बंगळुरुतील महिला हायवेवर उभी होती. एक रिक्षावाला तिच्या मदतीला धावून आला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा रिक्षावाला या महिलेश अत्यंत विनम्रपणे चक्क इंग्रजीत तिच्याशी संवाद साधू लागला. या रिक्षावाल्याचं इंग्रजी ऐकून महिलाही चकीत झाली. आणि इथूनच पुढच्या संवादातून अनेक गोष्टी उलगडत गेल्या.

निकिता अय्यर नावाच्या महिलेनं हा किस्सा सांगितला आहे. निकिताला ऑफिसला जायला उशीर झाला होता. ती रिक्षा कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करत होती. इतक्यात एक 74 वर्षाचा वयोवृद्ध माणूस रिक्षा चालवत निकिताच्या समोर येऊन उभा राहिला आणि निकिताला म्हणाला…

प्लीज कम मॅम… यू कॅन पे व्हॉट यू व्हॉन्ट… (प्लीज मॅडम, रिक्षात बसा, तुम्हाला वाटेल तेवढं भाडं द्या…)

रिक्षावाल्याचं इंग्रजी ऐकून निकीताला धक्काच बसला. एवढा वयोवृद्ध माणूस इतकं भारी इंग्रजी बोलतोय आणि चक्क रिक्षा चालकाचं काम करतोय, हे काहीजी अजब समीकरण असल्याचं निकीताला जाणवलं. म्हणून तिनं रिक्षा बसत या 74 वर्षांच्या रिक्षाचालकाशी संवाद आणखी वाढवला. 45 मिनिटांच्या या प्रवासात निकीतानं या रिक्षा चालकाचं अख्खं आयुष्य जाणून घेतलं. या संवादातून समोर आलेल्या गोष्टी या हृदयस्पर्शी आणि थक्क करणाऱ्या होत्या.

या रिक्षा चालकाचं नाव आहे, पताबी रमन.पताबी रमन यांनी निकीताला सांगितलं की ते एक इंग्रजीचे प्राध्यपक होते. त्यांनी एमए पर्यंत शिक्षण घेतलंय. इतकंच काय नंतर एमएडही केलंय. आता एवढं सांगितल्यानंतर निकीताचा पुढचा प्रश्न स्वाभाविक होता. तो प्रश्न रमन यांनाही लक्षात आला आणि त्यांनीच म्हटलं, की…

आता एवढं शिकलोय, इंग्रजी शिकवायचो, तर मी आता रिक्षा का चालवतोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना..?

याच प्रश्नाचं उत्तर नंतर रमन देऊ लागले. गेल्या 14 वर्षांपासून ते रिक्षा चालवण्याचं काम करत आहेत. मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये ते इंग्रजी शिकवत होते. पण नंतर त्यांना कर्नाटकमध्ये कोणतीही नोकरी मिळाली नाही. तुमची जात कोणती, असा प्रश्न त्यांना प्रत्येक वेळी विचारला जायचा. मी जात सांगितल्यावर लोकं, आम्ही तुम्हाला कळवू सांगून टाळून द्यायचे, असं रमन यांनी निकीता यांच्याशी बोलताना म्हटलंय.

पवईतील एका प्रतिष्ठीत कॉलेमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या या प्रोफेसरनं 20 वर्ष काम केलं. 60 व्या वर्षी ते रियाटर्ड झाले आणि कर्नाटकात परतले. रमन यांना कोणतीही पेन्शन नाहीये. शिवाय कर्नाटकात प्रोफेसरला 10 ते 15 हजार रुपयेच मिळतात, असं रमन यांनी सांगितलं. त्यापेक्षा रिक्षा चालवून मी 700 ते 1500 रुपये दिवसाला कमावतो. ही रक्कम माझ्यासाठी आणि माझ्या गर्लफ्रेन्डसाठी पुरेशी ठरते, असंही रमन यांनी म्हटलं आणि ते हसू लागले.

कोण आहे गर्लफ्रेन्ड?

गर्लफ्रेन्ड ते ही 74 व्या वर्षी आणि तेही एका रिक्षा चालकाची… हे निकीतासाठी आणखीनच चक्रावणारं होतं. मग पुढे रमन यांनी सांगितलं की ते आपल्या बायकोलाचं गर्लफ्रेन्ड म्हणतात. बायकोपेक्षा गर्लफ्रेन्ड म्हटल्यामुळे आमच्या नात्यात एक जिवंतपणा कायम राहिला आहे, तो अनेक नवरा-बायकोच्या नात्यात नसतो. रमन यांच्या या उत्तरानं निकीता अवाक् झाली होती. रमन हे दररोज नऊ ते दहा तास रिक्षा चालवतात. एका वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. त्याच्या मुलगाही घराचा रेंट भरण्यासाठी त्यांना मदत करतो. पण रमन हे आपल्या मुलावर निर्भर नाही. रिक्षा चालवण्याचं काम त्यांना मनापासून आवडतं, या कामातून त्यांना आनंदही मिळतोय आणि पैसे कमावण्याचं सूखही! अर्थात इंग्रजी प्रोफेसर होतो म्हणून रिक्षा चालवण्याचं काम कमी पणाचं आहे, असं चुकूनही त्यांच्या वागण्या बोलण्यात निकीताला जाणवलं नाही. ही या प्रोफेसर कम रिक्षा चालकाची खास बाब अनेकांच्या मनाला स्पर्शून जातेय.

वाचा इतर ट्रेन्डिंग बातम्या :

Video : मुलगा देवपूजेला करतो टाळाटाळ… मग काय घडतं? वनिताताईं पाटील यांनी सांगितली मजेशीर कथा; Kirtan viral

जब डांस हो जाए आऊट ऑफ कंट्रोल..! ‘हा’ Video पाहून डोळ्यांतून पाणी येईल, पण हसून हसून…

Viral : ‘हे’ अप्रतिमच आहे! बॅकफ्लिप्स मारून हत्तीच्या अंगावर जाणं सोपं नाही, पाहा Stunt video

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.