पंजाब | 25 जानेवारी 2024 : केंद्र सरकारने नागरिकांच्या हितासाठी देशभरात हेल्मेटसक्तीचा कायदा केला आहे. रस्त्यावर होणाऱ्या दुचाकी अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. हेल्मेट न घालता प्रवास करणाऱ्या वाहन चालकाला भाल मोठा दंड आकारण्याची तरतूद या नव्या नियमात करण्यात आली आहे. हेल्मेटसक्ती असूनही काही ठिकाणी नागरिक या कायद्याचे उल्लघन करताना दिसून येतात. असे चालक दिसले तरी पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. खरं तर या कायद्यामधून काही नागरिक आणि एका वर्गाला वगळण्यात आले आहे. कोण आहेत ते हे जाणून घेऊ.
दुचाकीस्वाराने हेल्मेट न घालता दुचाकी चालविताना पकडले गेल्यास त्याला 5000 रुपयांचा दंड करण्याच्या नियमाची तरतूद नवीन मोटार वाहन कायद्यात करण्यात आली आहे. परंतु, देशात असाही एक विभाग आहे जेथील नागरिकांना हेल्मेट घालणे अनिवार्य नाही. येथील नागरिक विनाहेल्मेट दुचाकी चालवू शकतात. त्यांनी हेल्मेट घातलेले नसेल तर ना पोलीस त्यांना अडवू शकत ना त्यांच्याकडून दंड वसूल करू शकत.
भारतात मोटार वाहन कायद्यात नवी सुधारणा करण्यात आली आहे, या नियमाच्या कलम 129 नुसार हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्यास दुचाकीस्वाराला 5000 रुपये दंड इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स तीन वर्षांसाठी निलंबित करण्याची कारवाईही करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या नियमातून एका विभागाला वगळण्यात आले आहे.
पंजाबमधील शीख समाजाला या नियमातून वगळण्यात आले आहे. शीख समजाच्या व्यक्ती या डोक्यावर पगडी धारण करतात. त्यामुळे त्यांना हेल्मेट घालता येत नाही. त्याची पगडी ही अपघातावेळी हेल्मेटसारखेच काम करते. त्यामुळेच शीख समाजाला हा नियम लागू होत नाही. त्याचप्रमाणे 4 वर्षाखालील मुलानाही या नियमातून वगळण्यात आले आहे. मात्र, 4 वर्षावरील मुलांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.