हा भारतीय व्यक्ती आहे जगातील सर्वात जास्त पगार घेणारा नोकरदार, वार्षिक पॅकेज इलॉन मस्कपेक्षाही जास्त, आकडा ऐकून बसेल धक्का

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की जगात सर्वाधिक पगार कोणाचा असेल? तुम्हाला हे वाचून निश्चित अभिमान वाटेल की जागात सर्वाधिक पगार घेणारा नोकरदार एक भारतीय माणूस आहे.

हा भारतीय व्यक्ती आहे जगातील सर्वात जास्त पगार घेणारा नोकरदार, वार्षिक पॅकेज इलॉन मस्कपेक्षाही जास्त, आकडा ऐकून बसेल धक्का
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 7:41 PM

भारत हा कृषीप्रधान देश आहे.पूर्वी येथील अर्थ व्यवस्था ही शेतीवर अवलंबून होती.मात्र जागतिकीकरणानंतर देशातील अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहराच बदलला. लोकांचं शेतीवरील अवलंबित्व कमी झालं आणि नोकरदार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनला, त्यामुळेच पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी, मात्र आताच्या काळात उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ शेती असं म्हटलं जातं.भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्वी शेतीवर अवलंबून होती, मात्र शेतीवर सातत्यानं येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे हळहळू शेतीवरील अवलंबित्व कमी झालं तर नोकरीवरील अवलंबित्व वाढलं. देशात वाढलेल्या उद्योग -धंद्यांमुळे नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या.नोकरीकडे अर्थजनाची एक सुरक्षित संधी आणि सेफ झोन म्हणून पाहिलं जातं.

दरम्यान तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की जगात सर्वाधिक पगार कोणाचा असेल? तुम्हाला हे वाचून निश्चित अभिमान वाटेल की जागात सर्वाधिक पगार घेणारा नोकरदार एक भारतीय माणूस आहे. या व्यक्तीचा महिन्याचा पगार हा तब्बल 1458 कोटी रुपये तर वर्षाचं पॅकेज 17 हजार 500 कोटी रुपये एवढं आहे. हा व्यक्ती दिवसाला 48 कोटी रुपये कमावतो. कोण आहे जगातील सर्वाधिक पगार घेणारी ही भारतीय व्यक्ती? जाणून घेऊयात

जगातला सर्वात जास्त पगार घेणारा माणूस कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आहे जगदीपसिंग जगातील सर्वात जास्त पगार घेणारा माणूस हा भारतीय आहे. जगदीपसिंग हे काँटम स्केप ( quantum scape) या कंपनीचे संस्थापक आहेत. इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीचं संशोधन करण्याचं काम ही कंपनी करते. कंपनीचे सीओ म्हणून ते अॅलन मस्क यांच्यापेक्षाही जास्त पगार घेतात.

त्यांच्या पगाराचं वार्षिक पॅकेज 17 हजार 500 कोटी रुपये एवढं आहे.ते महिन्याला 1458 कोटी रुपये पगार घेतात. त्यांचा एका दिवसाचा पगार 48 कोटी रुपये एवढा आहे. त्यांचा एक वर्षाचा पगार म्हणजे अनेक कंपन्यांची वार्षिक उलाढाल आहे. जगदीपसिंग हे स्टॅन फोर्ड विद्यापीठातून बीटेक आहेत. आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एमबीए केलं आहे, कंपनी स्थापन करण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. जगातल्या अनेक मोठ्या कंपन्यामध्ये भारतीय लोक सीईओपदावर आहेत.जगातील सर्वात जास्त पगार घेणारा नोकरदार हा बहुमान देखील एका भारतीयालाच मिळाला आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.