Driving Licenses | काय सांगता, इतक्या लोकांचा वाहन परवाना रद्द? असं काय घडले ‘या’ राज्यात..

Driving Licenses | ओडिशा राज्य परिवहन प्राधिकरणाने सुमारे 24,474 ई-चलान जारी केले आहेत. राज्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत मोहिम राबवली.  राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध ही चलान कापले.  राज्य परिवहन प्राधिकरणाने विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली.

Driving Licenses | काय सांगता, इतक्या लोकांचा वाहन परवाना रद्द? असं काय घडले ‘या’ राज्यात..
ओडिशात दुचाकीस्वारांविरोधात कारवाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 1:18 PM

Driving Licenses | दुचाकी चालकांवर मोठी कारवाई करत ओडिशाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) 12,000 हून अधिक वाहन परवाने (Driving license) रद्द केले आहेत. दोन आठवडे चाललेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून हेल्मेट (Helmet) न घालता दुचाकी चालवल्याबद्दल एसटीएने ही कारवाई केली आहे. एसटीने सुमारे 24,474 ई-चलान जारी केले आहेत आणि 888 परवाना नसलेली वाहनेही जप्त केली आहेत.

60 लाखांहून अधिकचा दंड

ही मोहीम 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत चालली, यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांकडून 60 लाख रुपयांहून अधिक दंडही (Challan) वसूल करण्यात आला.

इतक्या लोकांनी गमावला जीव

एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, हेल्मेटशिवाय वाहन चालवणे हे राज्यातील रस्ते अपघात आणि गंभीर दुखापतींचे सर्वात मोठे कारण आहे. गेल्या वर्षी सुमारे 1,308 दुचाकी-स्कूटर आणि मागे बसलेल्या लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.

हे सुद्धा वाचा

गंभीर जखमींचा आकडा मोठा

बहुतांश लोकांनी हेल्मेट न घातल्याने त्यांचा मृत्यू ओढावला. तर दुचाकी अपघातात एकूण 1,280 लोक गंभीर जखमी झाले आणि 747 जणांना किरकोळ दुखापत झाली. आकडेवारीवरुन जखमींपेक्षा मृतांची संख्या अधिक असल्याचे समोर येते.

12,545 परवाने रद्द

एसटीएच्या अंमलबजावणी पथकाने दंड म्हणून 63.98 लाख रुपये वसूल केले आणि हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याबद्दल 12,545 वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एचटी ऑटोच्या म्हणण्यानुसार, रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी ही मोहिम राबवण्यात आल्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त लालमोहन सेठी यांनी सांगितले.

हेल्मेट नको

या मोहिमेमुळे शहरी भागात लोकांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुर्दैवाने ते महामार्गांवर हेल्मेट घालण्याबाबत टाळाटाळ करताना दिसून येत आहे. महार्गावर हेल्मेटच्या संरक्षणाची अधिक गरज असते.

मोहिम सुरुच राहणार

राज्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत मोहिम राबवली.  राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध ही चलान कापले.  राज्य परिवहन प्राधिकरणाने विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. आगामी सणासुदीच्या काळात महिनाभर नियमित अंतराने अशा मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहितीही सेठी यांनी दिली. वाहतुकीचे नियम मोडणे, दारू पिऊन वाहन चालवणे आदी बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.