VIDEO | एका हातात पिस्तुल, तोंडात सिगरेट, लग्नाच्या मंडपात धीरेंद्र शास्त्री यांच्या भावानं हे काय केलं? पाहा

VIDEO | सध्या देशासह परदेशात बागेश्वर धामचे आणि धीरेंद्र शास्त्रींचे नाव गाजत आहे. पण त्यांच्या भावाने या चर्चेत अजून एक भर घातली आहे. तोंडात सिगरेट, हातात पिस्तूल अशा अवतारातील धीरेंद्र शास्त्रींच्या भावाने लग्नमंडपात का गोंधळ घातला, वाचा..

VIDEO | एका हातात पिस्तुल, तोंडात सिगरेट, लग्नाच्या मंडपात धीरेंद्र शास्त्री यांच्या भावानं हे काय केलं? पाहा
नवीन महाभारत
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 8:56 PM

नवी दिल्ली : सध्या देशासह परदेशात बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) आणि धीरेंद्र शास्त्रींचे नाव गाजत आहे. पण त्यांच्या भावाने या चर्चेत अजून एक भर घातली आहे. तोंडात सिगरेट, हातात पिस्तूल अशा अवतारातील धीरेंद्र शास्त्रींच्या (Dhirendra Shastri) भावाने लग्नमंडपात गोंधळ घातला. शालीग्राम गर्ग (Shaligram Gurg) असे या भावाचे नाव आहे. तो धीरेंद्र शास्त्री यांचा धाकटा भाऊ आहे. छोटे महाराज म्हणून शालीग्राम गर्ग परिचित आहे. एका दलित तरुणाच्या लग्न मंडपात जाऊन या छोटे महाराजने हे महाभारत घडविल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. याविषयीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. या व्हिडिओत शिवीगाळ केल्याचे दिसून येत आहे. तसेच एका व्यक्तीच्या हातात पिस्तूलही दिसत आहे. तो कोणाला तरी धमकावत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. आम्ही या व्हिडिओचा अथवा त्यासंबंधीची कोणतेही पुष्टी करत नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, धीरेंद्र शास्त्रींचा लहान भाऊ शालिग्राम गर्ग याने गढा गावातील कल्लू अहिरवार यांच्या मुलीच्या लग्नात हा गोंधळ घातला. शालिग्राम गर्ग हा दारुच्या अंमलाखाली असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. सिगरेट पिऊन त्याने हातात पिस्तूल दाखवत दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

हे सुद्धा वाचा

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, शालिग्राम गर्ग हा दारु पिलेला होता. त्याने लग्न मंडपात गोंधळ घातला. वऱ्हाडी मंडळींना धमकी दिली. पिस्तूल दाखवत वऱ्हाडींना शिव्या घातल्या. त्याने महिलांनाही शिव्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. छोटे महाराजने पिस्तुलातून हवेत गोळीबार करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वऱ्हाडी, महिला, लहान मुलं आणि स्थानिक लोकांना धक्का बसला. काहींना लागलीच लग्न मंडपातून काढता पाय घेतला.

अर्थात हा दहशत माजविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर लागलीच व्हायरल झाला. देशभरात, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक व्यक्ती सिगरेट ओढत आणि हातात पिस्तूल घेऊन स्थानिकांना धमकावत असल्याचे दिसून येते. तसेच तो शिव्या ही घालत आहे. तर एका व्यक्तीला तो मारहाण करताना दिसत आहे.

लग्नमंडपात इतर कोणतेच गाणे वाजविता येणार नाही, केवळ बागेश्वर धामचे गाणे वाजविता येईल, असा दम ही व्यक्ती देत आहे. त्याला लग्न मंडपातील लोकांनी विरोध केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने वऱ्हाडी मंडळींना शिव्या घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस सतर्क झाली. पोलिसांनी व्हिडिओतील व्यक्तीला शोधून काढण्याचे आणि पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे. पण दहशती खाली असलेल्या वधूकडच्या मंडळींनी पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.