अंबानी कुटुंबातील ‘या’ महिलेने टाकले नीता, ईशा अंबानी यांना मागे, रिलायन्सचे आहेत सर्वाधिक शेअर्स

अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज व्यवसाय विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या वर्षी भागधारकांनी आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या संचालक मंडळावर समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

अंबानी कुटुंबातील 'या' महिलेने टाकले नीता, ईशा अंबानी यांना मागे, रिलायन्सचे आहेत सर्वाधिक शेअर्स
MUKESH AMBANIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 7:43 PM

नवी दिल्ली | 7 मार्च 2024 : अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज व्यवसाय विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर कंपनीत नव्या पिढीलाही जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. रिलायन्सच्या भागधारकांनी गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांची तिन्ही मुले आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या संचालक मंडळावर समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तिन्ही भाऊ बहिणींचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे समान समभाग (शेअर्स) आहेत. महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही भाऊ बहिणींकडे जितके शेअर्स आहेत तितकेच शेअर्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्याकडे आहे. मात्र, या पाचही जणांपेक्षा सर्वाधिक शेअर्स अंबानी यांच्या कुटुंबातील एका महिलेकडे आहेत.

कोणाचे किती शेअर्स आहेत?

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीच्या सहा प्रवर्तकांकडे डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीमध्ये 50.30 टक्के इतका हिस्सा आहे. त्याचवेळी सार्वजनिक भागीदारी 49.70 टक्के इतकी आहे.

अंबानी कुटुंबातील सहा प्रवर्तकांमध्ये मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि मुले ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांचा समावेश आहे. याशिवाय मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन धीरू अंबानी यांच्याकडेही शेअर्स आहेत.

मुकेश अंबानी यांची तीन मुले आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे 80,52,021 इतके समान शेअर्स आहेत. जे अनुक्रमे 0.12 टक्के स्टेकच्या समतुल्य आहेत. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्याकडेही मुलांइतकेच म्हणजेच 80,52,021 इतके शेअर्स आहेत.

मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन धीरू अंबानी या सुद्धा रिलायन्स कंपनीमध्ये शेअर्स धारक आहेत. त्यांच्या नावे एकूण 1,57,41,322 शेअर्स आहेत. म्हणजेच त्या 0.24 टक्के हिस्साधारक आहेत. रिलायन्स कंपनीतील सर्वात मोठ्या वैयक्तिक भागधारक म्हणून कोकिलाबेन धीरू अंबानी यांचे नाव अग्रणी आहे.

दरम्यान, शेअर बाजारातील ऐतिहासिक वाढीदरम्यान मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या शेअर्समध्ये घसरण आली आहे. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर 1.60% घसरला आणि 2958.10 रुपयांवर बंद झाला. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 20 लाख कोटी रुपये इतके आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.