School : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील इतक्या हजार शाळांनी तोडला दम, शिक्षकांच्या नोकरीवर आली गदा, विद्यार्थी शाळेतून झाले बेदखल..

School : कोरोनाचा मोठा वाईट परिणाम देशातील शिक्षण क्षेत्रावर पडला आहे. इतक्या हजार शाळांना याकाळात टाळे लागले..

School : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील इतक्या हजार शाळांनी तोडला दम, शिक्षकांच्या नोकरीवर आली गदा, विद्यार्थी शाळेतून झाले बेदखल..
शाळेत झालेल्या भांडणात दुसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यूImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 7:37 PM

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) आपल्यासोबत अनेक चांगल्या गोष्टी ही घेऊन गेला. अनेकांचे प्रियजन गेले. अनेकांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या. अनेक क्षेत्रात कोरोनाचे दुष्परिणाम दिसून येतात. सर्वाधिक फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांना (Students And Teacher) मोठी किंमत चुकवावी लागली.

भारतातील शालेय शिक्षणासाठी एकात्मिक जिल्हा शिक्षण माहिती प्रणाली प्लसचा (UDISE Plus) अहवाल समोर आला आहे. 2021-22 मधील हा अहवाल आहे. यामध्ये देशातील शिक्षणाची विदारक स्थिती समोर आली आहे.

या अहवालानुसार, देशातील जवळपास 20,000 शाळा बंद पडल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या शाळांना ताळे लागले. देशभरातील एकूण शाळांपैकी एक टक्के शाळा बंद पडल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

त्याचा परिणाम शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर झाला. सर्वाधिक फटका बसला तो खासगी शाळांना. देशातील जवळपास 1.89 लाख शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली. एकूण शिक्षकांपैकी दोन टक्के शिक्षकांना या क्षेत्राला रामराम ठोकावा लागला.

कमाई घटल्याने, नोकऱ्या गेल्याने अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून काढून सरकारी शाळांमध्ये घातले. त्यामुळे खासगी शाळांचे आलेले अमाप पिक एकदम गायब झाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत दुप्पट विद्यार्थ्यांनी सराकरी शाळांमध्ये प्रवेश घेतला.

अहवालानुसार, शाळांची एकूण संख्या 2020-21 मध्ये 15.09 लाख होती. 2021-22 मध्ये ही संख्या 14.89 लाख इतकी झाली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत शिक्षण क्षेत्रात मोठी पडझड झाली. यापूर्वी 2018-19 मध्ये शाळांची संख्या घसरली होती.

कोरोनाच्या समाजाच्या प्रत्येक घटकावर मोठा परिणाम झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींच्या वेतनात कपात करण्यात आली. परिणामी पालकांनी खासगी शाळांच्या अमाप शुल्काच्या चिंतेने दाखला काढला.

अहवालानुसार, दुसऱ्या लाटेदरम्यान, सरकारी शाळांमध्ये 83.35 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर यापूर्वी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागलेली चढाओढ कमी झाली. खासगी शाळांमध्ये 68.85 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

सर्वाधिक फटका मध्यप्रदेश राज्यात बसला. 6,457 सरकारी शाळांमधील आणि 1167 खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्येत मोठी घसरण झाली. तर 24 टक्के खासगी शाळा कायमच्या बंद झाल्या.

प्रत्येक राज्यात शाळा बंद होण्याचे प्रमाण आहे. तिथल्या शिक्षकांच्या नोकऱ्या त्यामुळे गेल्या. तर विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाणही चिंताजनक आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम दिसून आला.

या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 11.5 टक्क्यांपर्यंत घसरली तर प्राथमिक शिक्षणावरही त्याचा मोठा परिणाम दिसून आला. कोरोनाने या शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. इयत्ता 1-5 पर्यंत 1.79 लाख विद्यार्थी शाळेत परतले नाहीत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.