नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी (intelligence agency) हा अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानमधील दहशहतवादी संघटना आयएसआयकडून (ISI) हा धोका असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
आयएसआय ही पाकिस्तानमधील प्रमुख दहशतवादी संघटना आहे. भारताच्या सीमांवर, देशांतर्गत काही ठिकाणांवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोका असल्याचं म्हटलं जातंय. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला ही माहिती दिली आहे.
देशभरात सध्या हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर झाली आहे. गुजरातेतदेखील लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यानंतर ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.
आयएसआयकडून धमकी देण्यात आलेली नसली तरीही केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे पुढील काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल.
PM Modi to embark on 2-day Gujarat visit today, lay foundation of projects worth Rs 15,670 cr
Read @ANI Story | https://t.co/n6npiBhJvg#PMModi #NarendraModi #pmmodiingujarat #Gujarat pic.twitter.com/w4Qho2SKmR
— ANI Digital (@ani_digital) October 19, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर येथे ते आज डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन करतील. त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील.