अगला नंबर बापू का… सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानातून धमकी
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना सोशल मिडीयाद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. ‘अगला नंबर बापू का’असे म्हणत सोशल मिडीयावर एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालच्या (Sidhu Moose wala) हत्येनं संपूर्ण देशात खळबळ माजली. या प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत असतानाच आता आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्या आची धमकी आली आहे. ही धमकी पाकिस्तानातून(Pakistan ) आल्याचे तपासात समोर आले आहे. बुधवारी पंजाबमध्ये पोलिस आणि काही गुंडामध्ये तुफान चकमक झाली. या चकमीत पोलिसांनी सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन आरोपींचा खात्मा केला.
‘अगला नंबर बापू का’
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना सोशल मिडीयाद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे. ‘अगला नंबर बापू का’असे म्हणत सोशल मिडीयावर एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
इन्स्टाग्रामवर पाकिस्तानमधून पोस्ट टाकण्यात आली
सिद्धूच्या काही मित्रांनी याबाबत माहिती दिली. इन्स्टाग्रामवर टाकण्यात आलेली ही पोस्ट पाकिस्तानमधून करण्यात आल्याचा दावा सिद्धूच्या मित्रांनी केला आहे. याच पोस्टमध्ये सिद्धूच्या वडिलांना धमकी देण्यात आली आहे. या धमकीची माहिती मुसेवालाच्या वडिलांनी पोलिसांना दिली असून पुढील तपास सुरू आहे.
सिद्धू मुसेवाल हत्याकांडाचे पाकिस्तान कनेक्शन
सिद्धू मुसेवालाच्या प्रकरण फक्त गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांची नावे समोर आली होती. यानंचर आता या हत्याकांडाचे पाकिस्तान कनेक्शनही समोर आले आहे. दोन्ही मारेकर्यांना अटारी येथे चकमकीत ठार केल्यावर मूसेवाला खून प्रकरणात नाट्यमय वळण आले आहे. यापूर्वी देखील सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आले होते.
मूसेवाला हत्याकांडातील दोन आरोपींचा एन्काऊंटमध्ये खात्मा
पंजाबमध्ये आज पोलिस आणि गुंडांमध्ये तुफान चकमक (Encounter) उडाली. त्यात चार शार्पशूटर्स (Sharpshooters) ठार झाले आहेत. यात गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन आरोपींचा समावेश आहे. मनप्रित सिंग उर्फ मन्नू कुसा आणि जगरु सिंग ऊर्फ रुपा अशी मूसेवाला हत्याकांडातील मयत आरोपींची नावे आहेत. तसेच चकमकीत गोळी लागून एका पत्रकारा (Journalist)ला गंभीर दुखापत झाली असून अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. अमृतसरमधील चिचा भकना गावात पोलिस आणि गॅगस्टर्समध्ये ही चकमक झाली आहे. या घटनेने संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. चिचा भकना गावात सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी संबंधित गुंड गावात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिस त्या गुंडांचा शोध घेण्यासाठी गावात आले होते. त्याचदरम्यान पंजाब पोलिसांवर गुंडांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिस आणि गुंडांमध्ये चकमक उडाली. त्यात पत्रकारही जखमी झाल्याचे पंजाब पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.