Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या महिन्यापासून तीन पद्धतीच्या वंदेभारत धावणार, रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण

जूनमध्यापर्यंत देशातील प्रत्येक राज्याला वंदेभारत एक्सप्रेस मिळणार आहे, वंदेभारतच्या निर्मितीचा वेग आता प्रचंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हे शक्य होणार आहे.

या महिन्यापासून तीन पद्धतीच्या वंदेभारत धावणार, रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण
Vande_Bharat_ExpressImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 12:37 PM

मुंबई : आलिशान आणि वेगवान वंदेभारत एक्सप्रेसच्या तीन आवृत्तींचा पुढील वर्षाच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून प्रवाशांना आनंद घेता येईल असे स्पष्टीकरण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलिकडेच पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे. या तीन प्रकारात वंदेभारत चेअरकार, वंदेभारत मेट्रो आणि वंदेभारत स्लिपर यांचा समावेश आहे. या तीन स्वदेशी सेमी हायस्पीड वंदेभारत एक्सप्रेस ट्रेन शताब्दी, राजधानी आणि लोकल ट्रेनच्या जागी चालविल्या जातील असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तीन ते चार वर्षांत रेल्वे रुळांची क्षमता वाढविण्याचे काम पूर्ण होईल त्यामुळे वंदेभारत तिच्या कमाल 160 किमी वेगाने चालविणे शक्य होईल. वंदेभारतचे तीन फॉरमॅट येणार आहेत. शंभर किमीपेक्षा अंतरावर वंदेभारत मेट्रो चालविण्यात येईल, 100 – 550 किलोमीटरच्या टप्प्यात वंदेभारतचे चेअरकार चालविण्यात येईल तर 550 किलोमीटरच्या पुढच्या अंतरासाठी वंदेभारत स्लिपर कोच चालविली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

नुकतीच दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे टर्मिनलहून उत्तराखंडच्या डेहराडून येथे वंदेभारत सुरू करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. दिल्ली ते डेहराडून वंदेभारतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच हिरवा झेंडा दाखविला. शताब्दी एक्सप्रेसला देशाची राजधानी दिल्ली ते उत्तराखंडची राजधानी डेहराडून प्रवासासाठी सहा तास दहा मिनिटे लागत होती. तोच प्रवास आता वंदेभारत एक्सप्रेसने साडेचार तासांत होणार आहे.

दर आठ ते नऊ दिवसांनी नवी वंदेभारत

जूनमध्यापर्यंत देशातील प्रत्येक राज्याला वंदेभारत एक्सप्रेस मिळणार आहे, वंदेभारतच्या निर्मितीचा वेग आता प्रचंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हे शक्य होणार आहे. दर आठव्या किंवा नवव्या दिवशी नवीन वंदेभारत फॅक्टरी बाहेर पडत आहे. दोन नवीन फॅक्टरी स्थापन करण्याचे काम सुरू असून एकदा सप्लाय चेन स्टॅबिलायझ होईल तेव्हा या कारखान्यातूनही वंदेभारत बाहेर पडेल असेही वैष्णव यांनी स्पष्ट केले.

सीमाभागात 4G आणि 5G चे नेटवर्कचे जाळे

वंदेभारतचा वेग दर ताशी 160 किमी असली तरी रूळांच्या क्षमतेअभावी त्या ताशी 130 किमीच्या वेगाने चालविण्यात येत आहेत. जुने रेल्वे ट्रॅक केवळ प्रति तास 70 ते 80 किमी वेगाने ट्रेन चालविण्याच्या क्षमतेचे आहेत. 35,000 किमीचा रेल्वे ट्र्रॅकची क्षमता प्रति तास 110 किमी, 130 किमी आणि 160 किमी वेगाचे करण्याच काम सुरू असून त्याला तीन ते चार वर्षे लागतील अशी माहिती रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिली आहे. सीमाभागात वंदेभारतचे जाळे पसविताना प्रवाशांना 4G आणि 5G चे नेटवर्क मिळावे यासाठी मोबाईल टॉवर उभारण्याचे कामही रेल्वे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.