Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या गोरीपोरा भागात सीआरपीएफच्या जवानांवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर 45 जवान जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्या दरम्यान सीआरपीएफच्या अनेक बसेस होत्या. यामध्ये एकूण 2500 […]

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या गोरीपोरा भागात सीआरपीएफच्या जवानांवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत, तर 45 जवान जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्या दरम्यान सीआरपीएफच्या अनेक बसेस होत्या. यामध्ये एकूण 2500 पेक्षा अधिक जवान होते.

दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या दोन बसला लक्ष्य केलं. अनेकदा जम्मू-काश्मीर, श्रीनगर येथे दहशतवाद्यांवर छोठ्या-मोठ्या कारवाया सुरु असतात. याशिवाय अनेक मोठे हल्लेही आतापर्यंत झाले आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीत देशातील गुरदासपूर, उरी सारख्या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. याला सडेतोड उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईकही केली होती. मात्र तरी सुद्धा आजा पुलवामा येथे जवानांवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.

4 ते 5 वर्षात झालेले देशातील मोठे हल्ले

गुरदासपूर : जुलै 2015 मध्ये दहशतवाद्यांनी एका प्रवासी बसवर हल्ला केला होता. यानंतर त्यांनी दीनानगर पोसीस स्टेशनमध्ये घुसून फायरिंग केली होती. तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता आणि यामध्ये सात लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

पठानकोट : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जानेवारी 2016 मध्ये पठानकोटमधील वायू सेनेवर हल्ला केला होता. यामध्ये 3 जवान शहीद झाले होते. दरम्यान यावेळी भारतीय जवानांनीही 4 दहशतवाद्यांना मारले होते.

कोकराझार : ऑगस्ट 2016 मध्ये आसामच्या कोकराझारमध्ये एका हल्ल्यात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या दहशतवाद्यांनी केला होता.

उरी : उरीमध्ये भारतीय सैन्याच्या अड्ड्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. यामध्ये भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

अमरनाथ : जुलै 2017 मध्ये अमरनाथ यात्रेनंतर एस बस परतत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 लोक मारले गेले होते.

व्हिडीओ : शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव.
वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम
वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम.
भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये भीम अनुयायांचा जल्लोष
भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये भीम अनुयायांचा जल्लोष.
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?.
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत.
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका.
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव.
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण.