नोटबंदी तर झाली आता 2024 मध्ये ‘ही’ बंदी होणार; तृणमूलनं सगळा इतिहासच खोदून काढला…

सीबीआय अधिकाऱ्यांनी टीएमसी नेत्याला चौकशीसाठी बोलवल्याचे त्यांनी सांगितले होते. शाळा भरती घोटाळ्यातील एक आरोपी कुंतल घोष यांनी आपल्या नावासाठी दबाव का आणला होता असा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

नोटबंदी तर झाली आता 2024 मध्ये 'ही' बंदी होणार; तृणमूलनं सगळा इतिहासच खोदून काढला...
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 1:02 AM

कोलकाता: सीबीआय अधिकाऱ्यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांची शाळा भरती घोटाळ्याच्या चौकशी संदर्भात सहा तासांहून अधिक काळ चौकशी केली. यावेळी सीबीआय चौकशीनंतर बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड टीका केली आहे. टीका करताना ते म्हणाले की, भाजपने आता नोटाबंदी केली आहे तर आता 2024 मध्ये मतदानावरही बंदी घालण्यात येणार आहे. नरेंद्र मोदीजी यांनी 2016 मध्ये 50 दिवसांचा वेळ मागितला होता, मात्र आज त्याला 7 वर्षे झाली आहेत. त्यांनी दिलेल्या अश्वासनानंतर तरी देशातील काळा पैसा संपला का? आज सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी, बॅनर्जी यांनी एजन्सीला पत्र लिहून सीबीआय आणि ईडीला तिची चौकशी करण्याची परवानगी देणार्‍या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या निर्णयाची यावेळी त्यांनी माहिती दिली.

टीएमसी नेत्यांनी सांगितले की, सीबीआयने मला समन्स पाठवले असले तरी माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. त्यांच्या या वृत्तीमुळेच आम्हाला आता भाजपला थांबवायचे आहे.

सीबीआय चौकशीबाबत अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, ते ‘दिल्लीच्या मालकाचे’चे पाळीव कुत्रा बनणार नाहीत, त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

त्यामुळेच आता 2024 मध्ये मतांवर बंदी येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये 50 दिवसांचा वेळ मागितला होता, मात्र आज 7 वर्षे झाली तरीही काळ्या पैशाबद्दल ते काहीही बोलत नाहीत.

आरबीआयकडूनही बंदी घालण्यात आली असली तरी त्यांच्या खांद्यावर पंतप्रधानांची बंदूक असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे नोटाबंदीने कोणताही फायदा होणार नाही.

कर्नाटकात जे झाले ते 2024 मध्ये पुन्हा होणार असून तुम्ही 10 वर्षांपासून लोकांची दिशाभूल करत आहात. कोरोनाच्या काळात वाटेत 140 लोकांचा मृत्यू झाला होता, त्याला जबाबदार कोण? तर त्या गोष्टींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सीबीआय अधिकाऱ्यांनी टीएमसी नेत्याला चौकशीसाठी बोलवल्याचे त्यांनी सांगितले होते. शाळा भरती घोटाळ्यातील एक आरोपी कुंतल घोष यांनी आपल्या नावासाठी दबाव का आणला होता असा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी घोष यांच्या वक्तव्यामागील कारणांची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. या घोटाळ्यातील एक आरोपी कुंतल घोष यांनी दाखल केलेल्या तक्रारीत टीएमसी नेते बॅनर्जी यांचे नावही पुढे आले होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.