राजघराण्यातील कन्या ते राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री; ‘असा’ आहे वसुंधरा राजेंचा जीवनप्रवास

वसुंधरा राजे यांचा 1984 साली भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला. वसुंधरा राजे यांच्याकडे असलेले नेतृत्व गुण, त्यांचा विनम्र स्वाभाव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांना 1998 साली वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री पद देण्यात आले.

राजघराण्यातील कन्या ते राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री; 'असा' आहे वसुंधरा राजेंचा जीवनप्रवास
वसुंधरा राजे
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 5:30 AM

वसुंधरा राजे सिंधिया (Vasundhara Raje) यांचा जन्म 8 मार्च, 1953 रोजी मुंबईत झाला. वसुंधरा राजे या ग्वाल्हेरचे शासक जिवाजी राव सिंधिया आणि त्यांची पत्नी राजमाता विजया राजे सिंधिया यांचे चौथे अपत्य आहे. वसुंधरा राजे यांनी प्रेझेंटेशन कॉन्वेंट स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण (Primary education) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबई (mumbai) यूनिवर्सिटीच्या सोफिया महाविद्यालयातून इकोनॉमिक्स आणि सायन्समध्ये पदवी मिळवली. वसुंधरा राजे यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह धौलपूर राजघराण्याचे राजे हेमंतसिंह यांच्यासोबत मोठ्या थाटात झाला. तेव्हापासून त्या राजस्थानशी जोडल्या गेल्या. वसुंधरा राजे यांनी आपल्या राजकीय जीवनाच्या व्यस्थतेमधून देखील वाचन, संगीत, घोडस्वारी, फोटोग्राफी सारखे छंद जोपासले आहेत. त्यांचा आणखी एक आवडा छंद म्हणजे त्यांना महागड्या आणि भरजरी साड्या परिधान करायला आवडतात. त्यांच्यावर लहानपणापासून समाजसेवेचे संस्कार झाले, त्यामुळे त्या आताही कायम सामाजिक कार्यात व्यस्त असतात.

1984 साली भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश

वसुंधरा राजे यांचा 1984 साली भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला. वसुंधरा राजे यांच्याकडे असलेले नेतृत्व गुण, त्यांचा विनम्र स्वाभाव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांना 1998 साली वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री पद देण्यात आले. 1999 साली पुन्हा एकदा त्यांनी केंद्रात राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी त्यांच्याकडे अणू उर्जा विभाग आणि अवकाश तंत्रज्ञान विभागाचा स्वतंत्र कारभार सोपवण्यात आला. या संधीचा फायदा घेऊन वसुंधरा राजे यांनी आपली एक वेगळी ओळख जनतेमध्ये निर्माण केली होती. त्यांना योग्य वेळी योग्य संधी देखील मिळत गेल्या.

राजस्थान भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष

वसुंधरा राजे मंत्री असतानाच राजस्थानचे भैरोवसिंह शेखावत हे उपराष्ट्रपती झाले. भैरोवसिंह शेखावत उपराष्ट्रपती झाल्याने राजस्थानमध्ये पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली. भाजपाला राजस्थानमध्ये असा एक नेता हवा होता, की जो समर्थपणे राजस्थानचे राजकारण सांभाळू शकतो. अर्थात ती ताकद वसुंधरा राजे यांच्याकडे असल्याने त्यांना 12 सप्टेंबर 2002 रोजी राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. वसुंधरा राजे यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळत राजस्थानमध्ये भाजप वाढवण्याचे काम केले. त्यांनी त्यासाठी परिवर्तण यात्रा देखील काढल्या. त्यानंतर त्या 2003 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत झालावाड जिल्ह्यातील झालरापाटन मतदारसंघातून विजयी झाल्या.

राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

वसुंधरा राजे प्रदेशाध्यक्ष असताना राजस्थानमध्ये भाजपाला भरघोस यश मिळाले राज्यात भाजपाची सत्ता आणि याचे बक्षिस म्हणून राजे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. अशा प्रकारे 1 डिसेंबर 2003 रोजी वसुंधरा राजे या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. 1 डिसेंबर 2003 ते 10 डिसेंबर 2008 या काळात त्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी आपल्या काळात राजस्थानमधील जनतेसाठी अनेक विकासाच्या योजना आणल्या, त्यांनी केवळ विकासाच्या योजना आणल्याच नाही तर त्याची अंमलबजावणी देखील केली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात ‘अक्षय काळेवा’, ‘मध्यान्ह भोजन योजना’, ‘पन्नाध्याय’, ‘भामाशाह योजना’, ‘हाडी राणी बटालियन’ आणि ‘महिला सक्षमीकरण’ अशा काही चांगल्या योजना राबवल्या. आतापर्यंत त्या कायमच स्त्री सक्षमीकरणासाठी काम करत आल्या आहेत. स्त्री सक्षम व्हावी, स्व:ताच्या पायावर उभी राहावी हेच त्यांचे स्वप्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

UP Assembly Election 2022 : वाराणसीत पिंक बुथवर महिलांची मतदानासाठी रांग

Big News: भारताचे पॅलेस्टाईनमधले राजदूत मुकूल आर्य यांचा संशयास्पद मृत्यू, घटनेची चौकशी सुरु, घात की नैसर्गिक मृत्यू?

J&K Attack : जम्मू कश्मीरात दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; पोलिसासह 23 नागरिक जखमी, एकाचा मृत्यू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.