नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली. आपण या पूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकले होते. आता आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे. ही टोळी देशभरात सक्रिय असून या टोळीने उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी केली. (Today there is a new class of people called ‘andolan jivi’ says narendra modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावर आपली भूमिका व्यक्त केली. तसेच देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत. देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वात आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात, अशी शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला.
देशात एक नवा एफडीआय आला
तुमचेही अनेक राज्यात सरकार असेल. तुम्हीही सरकार चालवत असाल. त्यावेळी तुम्हालाही या आंदोलनजीवींचा अनुभव आला असेल. त्यांचा त्रासही जाणवला असेल, असंही ते म्हणाले. आता देशात एक नवा एफडीआय आला आहे. त्याला Foreign destructive ideology म्हणतात. त्यापासून देशाला वाचवणं गरजेचं आहे, असं सांगतानाच आत्मनिर्भर भारत हा कोणत्या सरकारची नव्हे तर देशाची मोहीम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
डाव्यांवर टीका
यावेळी मोदींनी डाव्यांवर टीका केली. देशात कोणतीही सुधारणा घडवून आणली की ती अमेरिकेच्या इशाऱ्यावरूनच होत असल्याचा डावे नेहमी आरोप करतात. पूर्वी काँग्रेसचं सरकार असताना हे आरोप खूप व्हायचे. आता आमचं सरकार आलं तेव्हाही हेच आरोप होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
मोदी आहेत, संधी साधा
कोरोनामुळे तुम्ही बरेच दिवस घरात अडकून होता. त्यामुळे तुमचा राग माझ्यावर काढल्याने तुमचं मन हलकं झालं असेल. किमान तुमचा राग घालवण्याच्या कामी मी आलो. हे माझं सौभाग्य आहे. हा आनंद तुम्ही वारंवार घ्यावा आणि मोदी आहे तर ही संधी हमेशा घ्याच, असा चिमटा त्यांनी काढला. (Today there is a new class of people called ‘andolan jivi’ says narendra modi)
VIDEO : राष्ट्रपतींचं भाषण हे आत्मनिर्भर भारताचं दर्शन घडवणारं : पंतप्रधान मोदी#PMRajyaSabha #PMModi @PMOIndia @narendramodi @BJP4India pic.twitter.com/Xc1Wio8RCb
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
संबंधित बातम्या:
शरद पवार सुधारणांच्या बाजूनं, राजकारणासाठी काहींचा यूटर्न; मोदींचा टोला
‘अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चूपचाप पडा है’; मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद!
(Today there is a new class of people called ‘andolan jivi’ says narendra modi)