मुंबई: केंद्रीय रस्ते- वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात मोठी घोषणा केली होती. येत्या दोन वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वाहनांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता देशात कुठेही प्रवास करता येणे शक्य होणार आहे. (Toll Plaza free India Nitin Gadkari announcement)
रशियन सरकारच्या मदतीने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) ला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं असून, ही यंत्रणा लागू होताच भारत 2 वर्षांत टोलमुक्त होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या टोलचे उत्पन्न 5 वर्षात वाढणार असून, हे सगळं जीपीएस तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सहज शक्य होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून fastag चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. एनएचएआयच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण टोल संकलनात fastag चे योगदान मोठे आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही जीपीएस प्रणाली वापरली जाणार आहे.
रशियन सरकारच्या मदतीने 2 वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप
जीपीएस प्रणालीतून टोल थेट बँक खात्यातून वजा होणार
वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल होणार
तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम सुमारे 30 उपग्रहांचे नेटवर्क
20,000 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरते उपग्रह
तुम्ही कुठे आणि कोणत्या वाहनासोबत आहात याची अचूक माहिती
जीपीएस रिसीव्हरकडून सिग्नल रिसीव्ह करुन प्रक्रियेला सुरुवात
ऑटोमॅटिक घड्याळ्यांच्या माध्यमातून सॅटेलाईटमार्फत माहिती
जीपीएस प्रणालीच्या आधारे वाहनाच्या हलचालीवरून आकारणार टोल
कार, नौका, विमान, सेल्युलर फोनमध्ये सिस्टम वापरण शक्य
1970 च्या दशकात अमेरिकेकडून जीपीएस प्रणालीचा विकास
ही जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर टोलचे पैसे थेट बँक खात्यातून वळते होणार.
सरकार जुन्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्याची योजना आखत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या टोल उत्पन्नात 5 वर्षात प्रचंड वाढ होईल.
संबंधित बातम्या:
राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त न केल्यास आनेवाडी टोलनाका तोडणार : आमदार शिवेंद्रराजे भोसले
पुणे-पिंपरीतील वाहनांना टोलमाफी, खेड शिवापूर टोलनाका विरोधातील आंदोलन मागे
(Toll Plaza free India Nitin Gadkari announcement)