पुढील आठवड्यापासून या 28 स्पेशल ट्रेन तात्पुरत्या रद्द, तिकिटाचे पैसे परत मिळणार
पुढील आठवड्यापासून या 28 स्पेशल ट्रेन तात्पुरत्या रद्द, तिकिटाचे पैसे परत मिळणार (total 28 special trains will be canceled from next week)
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमार्फत देशभरात विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. सुमारे 65 टक्क्यांहून अधिक गाड्या कार्यरत आहेत. तथापि, काही कारणास्तव काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. आता आणखी सुमारे 28 विशेष गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात येत आहेत. काही अन्य ट्रेन डायव्हर्ट करुन चालवण्यात येतील, तर काही ट्रेनची यात्रा गंतव्य स्थानकापूर्वी समाप्त करण्यात येईल. (total 28 special trains will be canceled from next week)
काय म्हणाले जनसंपर्क अधिकारी?
पूर्व मध्य रेल्वे, हाजीपूरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले की, सोनपूर विभागांतर्गत बछवारा स्थानकात रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम केले जाणार आहे. यार्ड रिमॉडेलिंगसाठी आंतर-इंटरलॉकिंगचे काम चालू असल्याने या विभागातून जाणाऱ्या 28 विशेष गाड्यांचे कामकाज तात्पुरते रद्द केले जाईल. चार विशेष गाड्यांचा मार्ग बदलला जाईल, तर चार विशेष गाड्या अंशतः कार्यरत असतील. तसेच 3 विशेष गाड्यांचे वेळापत्रक बदलून चालविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रद्द केलेल्या स्पेशल गाड्यांची यादी
1. 03367 कटिहार-सोनपुर मेमू पॅसेंजर 25.02.2021 ते 04.03.2021 पर्यंत 2. 03368 सोनपूर-कटिहार मेमू पॅसेंजर 25.02.2021 ते 04.03.2021 पर्यंत 3. 03226 राजेंद्रनगर टर्मिनल-जयनगर पॅसेंजर 25.02.2021 ते 03.03.2021 पर्यंत 4. 03225 जयनगर-राजेंद्रनगर टर्मिनल पॅसेंजर 25.02.2021 ते 03.03.2021 पर्यंत 5. 03315 कटिहार-समस्तीपुर मेमू पॅसेंजर 25.02.2021 ते 04.03.2021 पर्यंत 6. 03316 समस्तीपुर-कटिहार मेमू पॅसेंजर 25.02.2021 ते 04.03.2021 पर्यंत 7. 02564 नई दिल्ली-सहरसा एक्सप्रेस 24.02.2021 ते 03.03.2021 पर्यंत 8. 02563 सहरसा-नवी दिल्ली एक्सप्रेस 23.02.2021 ते 02.03.2021 पर्यंत 9. 03227 सहरसा-बरौनी एक्सप्रेस 25.02.2021 ते 03.03.2021 पर्यंत 10. 03228 बरौनी-सहरसा एक्सप्रेस 25.02.2021 ते 03.03.2021 पर्यंत 11. 02553 सहरसा-नवी दिल्ली एक्सप्रेस 26.02.2021 आणि 28.02.2021 12. 02554 नवी दिल्ली- सहरसा एक्सप्रेस 27.02.2021 आणि 01.03.2021 13. 03419 भागलपूर-मुजफ्फरपूर एक्सप्रेस 28.02.2021 ते 02.03.2021 पर्यंत 14. 03420 मुजफ्फरपुर-भागलपुर एक्सप्रेस 28.02.2021 ते 02.03.2021 पर्यंत 15. 01665 हबीबगंज-अगरतल्ला एक्सप्रेस 24.02.2021 रोजी 16. 01666 अगरतल्ला-हबीबगंज एक्सप्रेस 27.02.2021 रोजी 17. 09451 गांधीधाम-भागलपूर एक्सप्रेस 26.02.2021 रोजी 18. 09452 भागलपूर-गांधीधाम एक्सप्रेस 01.03.2021 रोजी 19. 09305 डॉ आंबेडकर नगर-कामाख्या एक्सप्रेस 25.02.2021 रोजी 20. 09306 कामाख्या-डॉ आंबेडकर नगर एक्सप्रेस 28.02.2021 रोजी 21. 03165 कोलकाता-सीतामढी एक्सप्रेस 27.02.2021 रोजी 22. 03166 सीतामढ़ी-कोलकाता एक्सप्रेस 28.02.2021 रोजी 23. 03185 सियालदह-जयनगर एक्सप्रेस 27.02.2021 रोजी 24. 03186 जयनगर-सियालदह एक्सप्रेस 28.02.2021 रोजी 25. 05028 गोरखपूर-हटिया एक्सप्रेस 28.02.2021 रोजी 26. 05027 हटिया-गोरखपूर एक्सप्रेस 01.03.2021 रोजी 27. 05047 कोलकाता-गोरखपूर एक्सप्रेस 01.03.2021 रोजी 28. 05048 गोरखपूर-कोलकाता एक्सप्रेस 28.02.2021 रोजी
मार्गात बदल करुन चालवण्यात येणाऱ्या गाड्या
01. 03106 बलिया-सियालदह एक्सप्रेस 25.02.2021 ते 02.03.2021 पर्यंत व्हाया परमानंदपुर- पाटलिपुत्र-पटना-मोकामा मार्गे 02. 02519 लोकमान्य टिळक टर्मिनल-कामाख्या एक्सप्रेस 28.02.2021 रोजी व्हाया पटना-मोकामा-न्यू बरौनी मार्गे 03. 02520 कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस 25.02.2021 रोजी व्हाया न्यू बरौनी-मोकामा-पटना मार्गे 04. 02578 मैसूर-दरभंगा एक्सप्रेस 26.02.2021 रोजी व्हाया पाटलिपुत्र-हाजीपुर-समस्तीपुर मार्गे 05. 02550 आनंदविहार टर्मिनल-कामाख्या एक्सप्रेस 27.02.2021 आणि 01.03.2021 रोजी व्हाया पटना-मोकामा-न्यू बरौनी मार्गे 06. 02423 डिबू्रगढ़-नई दिल्ली एक्सप्रेस 27.02.2021 ते 01.03.2021 पर्यंत व्हाया न्यू बरौनी-मोकामा-पटना मार्गे 07. 02424 नवी दिल्ली- डिब्रगढ़ एक्सप्रेस 27.02.2021 ते 01.03.2021 पर्यंत व्हाया पटना-मोकामा-न्यू बरौनी मार्गे 08. 02506 आनंदविहार टर्मिनल-कामाख्या एक्सप्रेस 28.02.2021 रोजी व्हाया परमानंदपुर-पाटलिपुत्र-पटना-मोकामा-न्यू बरौनी मार्गे
अंशतः चालवण्यात येणाऱ्या गाड्या
01. 04185 ग्वालियर-बरौनी स्पेशल ट्रेन 24.02.2021 ते 01.03.2021 पर्यंत बरौनी ऐवजी समस्तीपुरपर्यंत जाईल 02. 04186 बरौनी-ग्वालियर स्पेशल ट्रेन 25.02.2021 ते 02.03.2021 पर्यंत बरौनी ऐवजी समस्तीपुर ते ग्वालियर पर्यंत जाईल 03. 07005 हैदराबाद डक्कन-रक्सौल स्पेशल ट्रेन 25.02.2021 रोजी रक्सौल ऐवजी बरौनीपर्यंत जाईल 04. 07006 रक्सौल-हैदराबाद डक्कन स्पेशल ट्रेन 28.02.2021 रोजी रक्सौल ऐवजी बरौनीहून सुटेल 05. 03021 हावड़ा-रक्सौल स्पेशल ट्रेन 27.02.2021 रोजी रक्सौल ऐवजी बरौनीपर्यंत जाईल 06. 03022 रक्सौल-हावड़ा स्पेशल ट्रेन 28.02.2021 रोजी रक्सौल ऐवजी बरौनीपर्यंत हावड़ापर्यंत जाईल 07. 03135 कोलकाता- जयनगर स्पेशल ट्रेन 27.02.2021 रोजी जयनगरऐवजी बरौनीपर्यंत जाईल 08. 03136 जयनगर- कोलकाता स्पेशल ट्रेन 28.02.2021 रोजी जयनगरऐवजी बरौनीहून कोलकातापर्यंत जाईल
पुन्हा शेड्युल केलेल्या गाड्या
01. 27.02.2021 रोजी सिकंदराबादहून सुटणारी 07007 सिकंदराबाद-दरभंगा स्पेशल ट्रेन बरौनीमध्ये 30 मिनिटे नियंत्रित करुन चालवली जाईल 02. 02.03.2021 रोजी ग्वालियरहून सुटणारी 04185 ग्वालियर-बरौनी स्पेशल ट्रेन छपरा आणि समस्तीपुर दरम्यान 20 मिनिटे नियंत्रित केली जाईल 03. 28.02.2021 रोजी दरभंगाहून सुटणारी 05234 दरभंगा-कोलकाता स्पेशल ट्रेन दरभंगा स्टेशनवर 90 मिनिटे नियंत्रित केली जाईल.
तिकिटाचे पैसे परत मिळणार
देशभरात चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये अद्यापही रिझर्व्हेशन असेल तरच प्रवासाची परवानगी आहे. कन्फर्म तिकिट असेल तरच प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करु शकतात. ज्या 28 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्याचे तिकिटाचे पैसे परत देण्यात येतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. (total 28 special trains will be canceled from next week)
Sandalwood | चंदनाचे ‘हे’ फेस पॅक बनवतील चेहरा आणखी चमकदार, तुम्हीही करू शकता ट्राय!#Chandan | #sandalwood | #Facebeauty | #beautytips | #skincare https://t.co/sK9twUAdP6
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2021
इतर बातम्या
नव्या फीचर्ससह Hero Xtreme 160R लिमिटेड एडिशन लाँच होणार, किंमत…
पेट्रोलच्या किंमती रडवणार! देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल आज नांदेडमध्ये; वाचा ताजे दर