Corona Virus : कोरोनामुळे ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात?
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर (Corona Virus jobs crisis) भारताने सर्व परदेशी पर्यटकांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द केले आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर (Corona Virus jobs crisis) भारताने सर्व परदेशी पर्यटकांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द केले आहेत. यामुळे पर्यटन क्षेत्र आणि हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. व्हिसा रद्द केल्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे. त्यामुळे काही क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
आधी आर्थिक मंदी आणि आता कोरोनामुळे पर्यटकांनी (Corona Virus jobs crisis) अनेक टूर रद्द केल्या आहेत. त्याचा आर्थिक फटका पर्यटन क्षेत्राला बसला आहे. आतापर्यंत जवळपास 10 ते 12 लाख लोकांनी आपल्या बुकिंग रद्द केल्या आहेत. यामुळे जवळपास 3 अरब डॉलरचे नुकसान झाले आहे.
इटली-स्पेनमध्ये लॉकडाऊन, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशात काय खबरदारी?
त्यामुळे हॉटेल, पर्यटन आणि एअरलाईन्स क्षेत्रातील नोकऱ्या जाण्याची शंका व्यक्त होत आहे. या क्षेत्रांना जवळपास 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक फटका
कोरोनाचा थेट परिणाम शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक स्थितीचा आढावा घेता याचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्राला बसताना दिसत आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइडर्स बेरोजगार झाले आहे. अनेक ठिकाणी पर्यटकांनी बुकिंग रद्द करत आहे. काही ठिकाणी हॉटेल, एअरलाईन्स आणि ट्रेनचे पैसे परत करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी पैसे परत मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे काही कंपन्यांनीही 31 मार्चपर्यंत सर्व इवेंट्स, मीटिंग कॉन्फरन्स आणि सेमिनार रद्द केले आहे. कंपन्यांच्या अशाप्रकारच्या सेमिनारमधून हॉटेल व्यावसायिकांना 40 टक्के फायदा होतो. जर एक ते दोन महिने हॉटेल व्यावसायिकांचा कारभार ठप्प राहिला, तर याचा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसू शकतो.
हॉटेल व्यावसायिकांच्या कमाईत घट
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हॉटेल इंडस्ट्रीवरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील कमाईत 60 टक्क्यांनी घट झाली आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांमुळे भारताला 2 लाख कोटींची कमाई होते.
दर महिन्यात जवळपास 10 लाख परदेशी पर्यटक भारतात येतात. यातील 60 ते 65 टक्के परदेशी पर्यटक हे ऑक्टोबर ते मार्च महिन्यात येतात. मात्र कोरोनामुळे या पर्यटकांची संख्या घटली आहे.
Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, राज्यातील रुग्णांची संख्या 33 वर
हॉटेल व्यावसायिकांची 60 टक्के कमाई ही NRI कडून होते. मात्र कोरोनामुळे त्यांनीही अनेक यात्रा रद्द केल्या आहेत. आतापर्यंत भारतातील 35 टक्के लोकांनी विदेशी यात्रा रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे अनेक एअरलाईन्स कंपन्यांनी विमानाची तिकीटे स्वस्त झाली (Corona Virus jobs crisis) आहेत.