दिल्ली सीमेवरुन शेतकऱ्यांना हुसकावून लावले, पोलिसांशी हुज्जत, काय घडतंय नेमंक

नोएडा येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला रोखत पोलिसांनी कलम १६३ अंतर्गत कारवाई करीत अटक केली आहे. शेतकरी आंदोलकांना बसेसमध्ये भरुन त्यांना जिल्हा कारागृहात नेण्यात आले.नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दिल्ली सीमेवरुन शेतकऱ्यांना हुसकावून लावले, पोलिसांशी हुज्जत, काय घडतंय नेमंक
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 4:52 PM

दिल्ली-नोएडा येथे शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. नोएडा येथील दलित प्रेरणास्थळावर सोमवारपासून शेतकरी अनिश्चितकाळासाठी आंदोलनासाठी ठिय्या मारुन बसलेले होते. पंरतू मंगळवारी या शेतकऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली असून १६० हून शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या आधी दलित प्रेरणा स्थळावर मोठा पोलिसी फौजफाटा तैनात करण्यात आला होता.या दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ग्रेटर नोएडा हायवेवर अनेक किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली.

नोएडाच्या सेक्टर ९५ येथील दलित प्रेरणा स्थळाजवळ शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु होते. या आंदोलकांत अचानक गोंधळ माजला आहे, कारण मोठ्या संख्येने जमलेले शेतकऱ्यांना पकडून पोलिसांना वाहनात कोंबले. त्यानंतर त्यांची रवानगी लुक्सर जेलमध्ये करण्यात आली आहे. या दरम्यान पोलिस आणि शेतकऱ्यांत मोठी चकमक उडाली. त्यांच्या वाहनांना देखील हटविण्यात आले.

भारतीय किसान परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखबीर खलीफा, भारतीय किसान यूनियनचे ( पश्चिमी उत्तर प्रदेश ) प्रदेश अध्यक्ष पवन खटाना, शेतकरी नेते सुनील फौजी, उदल यादव, सुनील प्रधान, रूपेश वर्मा आणि अमन भाटी सह अनेक शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान, शेतकऱ्यांना अटक केल्याच्या निषेधार्त भारतीय किसान युनियनने ( BKU ) मुझफ्फर नगरात आज सायंकाळी चार वाजता एक पंचायत बोलावली आहे. त्यात राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत देखील सामील होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

भारतीय न्याय संहितेच्या ( बीएनएस ) कलम १६३ उल्लंघन केल्याने शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना बसमध्ये भरुन जिल्हा तुरुंगात पाठविण्यात आले आहे.शहरात कलम १६३ लागू झाल्याने त्याच्या उल्लंघनामुळे शेतकऱ्यांना अटक झाल्याने पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना सोमवारी गौतमबुद्धनगरच्या सीमेवरच रोखले होते. महामाया उड्डाणपुलामार्गे दिल्ली जाणाऱ्या शेतकऱ्यांना नोएडा पोलिसांना दलित प्रेरणा स्थळाच्या पुढे येऊ दिले नाही.

नाराज शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

पोलिसांनी रोखल्याने नाराज झालेले शेतकरी रस्त्याच्या मधोमध धरण्यावर बसले. त्यानंतर सायंकाळी पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शासनाशी संवाद साधण्याचा आश्वासन दिल्याने त्यानंतर दिल्ली-नोएडा लिंक रोड मोकळा होऊ शकला.परंतू शेतकरी दलित प्रेरणा स्थळावर ठाण मांडून बसले होते. रात्रीपर्यंत या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.शेतकऱ्यांनी तेथे जेवणाची व्यवस्था केली. थंडी पासून वाचण्यासाठी ब्लॅंकेट,रजई असा जामानिमा मागविला होता.रात्री शेतकऱ्यांनी गाणी गाऊन आणि भाषणे करुन एकमेकांचा उत्साह वाढवला. सरकारानी विविध प्रकल्पांसाठी संपादन केलेल्या जमीनीला योग्य मोबदल्याची मागणी करीत अनेक ठिकाणांवरुन आलेल्या शेतकऱ्यांनी काल सोमवारी दिल्लीकडे आगेकुच केली होती, परंतू त्यांना नोएडा-दिल्ली सीमेच्या पुढे जाऊ दिले नाही.पोलिसांनी त्यांना तेथेच रोखले.

शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मार्च

जर सात दिवसात त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरी आंदोलक ‘बोल किसान, हल्ला बोल’ असे नारे देत दादरी – नोएडा लिंक रोडवर महामाया उड्डाण पुलावर एकत्र झाले आणि सकाळी ११.३० वाजता त्यांनी आपला दिल्ली चलो मोर्चा सुरु केला.

त्यामुळे रस्त्यावर मोठा चक्काजाम झाला त्यामुळे काल सोमवारी दिल्ली-नोएडा सीमेवरुन जाणाऱ्या प्रवाशांना अनेक तास ट्रॅफीक जाममध्ये अडकून पडावे लागले.पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्समुळे देखील नागरिकांना त्रास झाला.शेतकऱ्यांनी नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर अनेक तास आंदोलन केले. कारण अनेक शेतकरी बॅनर आणि झंडे फडकत सुरुवातीच्या अडथळ्यांना पार करीत तेथे पोहचले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या प्रवेशाजवळील चिल्ला बॉर्डरच्या एक किमी अंतरावर दलित प्रेरणास्थळाजवळ रोखण्यात आले.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.