‘आलोच पटकन एक चपटी मारुन’ तासभर ट्रेन थांबवून गेला आणि गळा शेकवून आला!

जीआरपीनं याबाबत तपास केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार असिस्टंट लोको पायलट कर्मवीर प्रसाद यादव हा जवळच्याच एका दारुच्या दुकानात गेला.

'आलोच पटकन एक चपटी मारुन' तासभर ट्रेन थांबवून गेला आणि गळा शेकवून आला!
हाच तो तळीराम 'कर्मवीर'Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 2:05 PM

चक्क ट्रेन थांबवून चालक थेट दारु पिण्यासाठी गेला. घटना परदेशातली नव्हे, तर भारतातलीच आहे. बिहारमध्ये (Bihar Train Drunk co-pilot) ही घटना उघडकीस आली आहे. दारु (Alcohol) पिण्यासाठी ट्रेन तासभर लेट करणाऱ्या या चालकाविरोधात रेल्वेनं कारवाईही केली आहे. हिंदुस्थान टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलंय. सोमवारी ही घटना घडली. समस्तीपूर आणि सहरसा (Samastipur-Saharsa train ) या ट्रेनच्या प्रवासादरम्यान, हा किस्सा घडला. आली तलप, गेलो तडक, असा प्रकार या रेल्वे चालकानं केला आहे. असिस्टंट को पायलट असणाऱ्याला दारुची तलप आली म्हणून त्यानं चक्क तासभर ट्रेन थांबवली आणि तो थेट दारुच्या दुकानाच गेला. ट्रेन नंबर 05278 या क्रमाकांची गाडी प्रवाशांना घेऊन निघाली होती. पण ही ट्रेन हसनपूर स्थानकाजवळ अचानक थांबली. खरंतर एका राजधानी एक्स्प्रेसला जाण्यासाठी ही गाडी साईडिंगला काढण्यात आली होती. दोन मिनिटांसाठी साईडिंगला काढलेली गाडी तासभर तिथंच थांबून राहिल्यानं नेमकं झालंय काय, हे कळायला मार्ग नव्हता. प्रवाशांनी चौकशी करायला सुरुवा केली. यात वेळ लागला. पण जेव्हा काय झालंय ते प्रवाशांना कळलं, तेव्हा त्यांना वेड लागण्याची पाळी आली.

नाव कर्मवीर आणि काम…. बोलायलाच नको

जीआरपीनं याबाबत तपास केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार असिस्टंट लोको पायलट कर्मवीर प्रसाद यादव हा जवळच्याच एका दारुच्या दुकानात गेला. ट्रेन थांबल्यामुळे तो गाडीतून उतरला आणि दारुच्या दुकानावर गेल्याचं निदर्शनास आलं.

हे सुद्धा वाचा

बिहारमध्ये एकापेक्षा एक लोकं आहेत, हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. कारण ही घटना समोर येण्याआठी आठ दिवस अगोदरच असाच एक प्रकार समोर आलेला. एका रेल्वे चालकानं चक्क चहासाठी ट्रेन रेल्वे क्रॉसिंदरम्यान थांबवेली. ग्वालीअर-बाराऊनी एक्स्प्रेस थांबवून चालकानं चहाचा कप घेतल्याचा व्हिडीओही समोर आलेला. दरम्यान, आता दारु पिण्यासाठी गेलेल्या चालकाचा प्रकार अधिकच गंभीर आहे.

आता चौकशी होणार…

तासभर गायब असलेला हा ट्रेनचा चालक जेव्हा सापडला, तेव्हा तो प्रचंड नशेत होता. गाडी चालवण्याच्या अजिबात अवस्थेत तो नव्हता. आता ट्रेन पुढे न्यायची कशी असा प्रश्न रेल्वे प्रवाशांसोबत रेल्वे प्रशासनालाही पडला होता. अखेर याच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका दुसऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला मग जबाबदारी देण्यात आली. पण या सगळ्यात दारुमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं. आता रेल्वे प्रशासनानं या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचं म्हटलंय.

पाहा व्हिडीओ :

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.