7 प्रवाशांच्या शरीरावरुन धडधडत गेली भरधाव कोणार्क एक्स्प्रेस! रेल्वेतून खाली उतरणं जीवावर बेतलं, जागीच मृत्यू

विरुद्ध दिशेनं येणारी कोणार्क एक्स्प्रेस भरधाव वेगानं सिकंदाबादर-गुवाहारी रेल्वेला क्रॉसिंग करत निघाली होती. त्यादरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली.

7 प्रवाशांच्या शरीरावरुन धडधडत गेली भरधाव कोणार्क एक्स्प्रेस! रेल्वेतून खाली उतरणं जीवावर बेतलं, जागीच मृत्यू
...म्हणून कधीच रेल्वे रुळांवर उतरु नये! (प्रातिनिधिक फोटो)Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:18 AM

नवी दिल्ली : सात जणांचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी अंत (Seven Railway Passengers killed) झाला आहे. ही धक्कादायक घटना घडली आंध्र प्रदेशच्या एका जिल्ह्यामध्ये. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात सोमवारी घडलेल्या या घटनेत सात जणांचा जागीच जीव गेला आहे. एका भरधाव एक्स्प्रेस सात जणांच्या अंगावरुन धडधडत (Train Runs over) गेली आणि सातही जणांच्या चिंधड्या उडाल्यात. सिकंदराबाद-गुवाहाटी सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून हे सर्व प्रवासी प्रवास करत होते. त्यादरम्यान, ही घटना घडली. काही काळासाठी सिकंदराबार-गुवाहारी सुपरफास्ट एक्स्प्रेस (Secunderabad-Guwahati Superfast Express) एका रेल्वे स्थानकावर थांबली होती. गाडीत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही एक्स्प्रेस एके ठिकाणी थांबली होती. बराच वेळ झाला गाडी थांबलेली आहे, हे पाहून या एक्स्प्रेसमधील काही प्रवासी हे गाडीतून खाली उतरले. त्यादरम्यान, ही काळजाचा थरकाप उडवणारी धक्कादायक घडना घडली. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

…आणि शरीरावरुन ट्रेन धडधडत गेली

रेल्वेच्या धडकेत मृत झालेल्या या प्रवासांसोबत नेमकं काय घडलं, याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सिकंदराबादर-गुवाहारी सुपरफास्ट एक्स्प्रेस ही काही तांत्रिक बिघाडामुळे बटुवा नावाच्या गावाजवळ थांबवण्यात आली होती.

गाडी थांबल्याचं पाहून काही प्रवासी गाडीतून खाली उतरले. रेल्वे रुळांवर उतरलेल्या प्रवाशांना आपल्या सोबत काय घडू शकतं, याची पुसटशीही कल्पना नव्हती. रेल्वे ट्रॅकवर उतरेल्या प्रवाशांना शेजारील रेल्वे ट्रॅकवर एक भरधाव वेगानं गाडी जाणार आहे, याची जाणीवच नव्हती. मात्र जेव्हा ही भरधाव गाडी बाजूच्या रेल्वेट्रॅकवर आली, तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती.

दुर्दैवी घटना

विरुद्ध दिशेनं येणारी कोणार्क एक्स्प्रेस भरधाव वेगानं सिकंदाबादर-गुवाहारी रेल्वेला क्रॉसिंग करत निघाली होती. त्यादरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली. भरधाव रेल्वे सातही जणांच्या शरीरावरुन धडधडत गेली. सातही जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व्हाय एस जगनमोहन रेड्डी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाला तातडीनं बचावकार्य करण्याचे आदेशही जारी करण्यात आली आहे. या अपघातातील मृतांची नावं अद्याप कळू शकलेली नाही. दरम्यान, काही जण या जखमी झालेले असण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्यासह चौघांविरोधात अकोल्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

धक्कादायक ! आधी पत्नी आणि मुलाची हत्या केली, मग हत्येचे व्हिडिओ फोटो स्टेटसला ठेवले; वाचा नेमके काय घडले ?

Jalgaon Accident : जळगावमध्ये मुंबई-नागपूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.