Indian Railway | भारतीय रेल्वेचे अनोखे स्टेशन, जेथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सुटते ट्रेन

| Updated on: Sep 03, 2023 | 7:28 PM

भारतीय रेल्वेचे जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. भारतातील रेल्वे मार्गांची लांबी एकूण 63,415 किमी इतकी मोठी आहे. भारतीय रेल्वेने दोन कोटीहून अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. रेल्वेचे एक असं स्टेशन आहे जेथून देशात कुठेही जाता येतं...

Indian Railway | भारतीय रेल्वेचे अनोखे स्टेशन, जेथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सुटते ट्रेन
indian railway
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : जेव्हा आपल्या लांबचा प्रवास करायचा असेल तर आपण रेल्वेचा आधार घेतो. भारतीय रेल्वेने दररोज दोन कोटीहून अधिक लोक रोजचा प्रवास करीत असतात. रेल्वे सर्वात स्वस्त आणि जलद प्रवासाचे साधन आहे. भारतील रेल्वे नेटवर्क जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे. देशातील जम्मू-कश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेचे जाळे पसरले आहे. अशात तुम्हाला असे एक स्टेशन माहीती आहे का जेथून तुम्हाला देशातील सर्व कानाकोपऱ्यात जाणाऱ्या ट्रेन पकडता येतात. असे रेल्वे स्थानक तुम्हाला माहीतीच असायला हवे चला पाहूयात त्या स्थानकाचे नाव…

भारतीय रेल्वेचे जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. भारतातील रेल्वे मार्गांची लांबी एकूण 63,415 किमी इतकी मोठी आहे. भारतीय रेल्वेने दोन कोटीहून अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. भारतीय रेल्वेवर आठ हजार प्रवासी रेल्वे गाड्यांसह एकूण 13 हजार गाड्या रोज धावतात. देशात एक रेल्वे स्थानक त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. या स्थानकातू देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात ट्रेन जाते. या स्थानकाचे नाव मथुरा जंक्शन असे आहे. मथुरा जंक्शनमधून देशात कुठल्याही कोपऱ्यात जाण्यासाठी 24 तासात ट्रेन मिळते. या स्थानकातून उत्तर भारतासाठी तर डझनावारी ट्रेन आहेत. परंतू दक्षिणेत जाणारी ट्रेन दिल्लीनंतर येथूनचे रवाना होते.

चारही दिशांना जाणाऱ्या ट्रेन सुटतात

मथुरा जंक्शन उत्तर मध्य रेल्वे मार्गावर येते. हे देशातील सर्वात मोठे जंक्शन आहे. तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य वाटेल की देशातील बहुतेक सर्व राज्यात आणि अनेक शहरात जाण्यासाठी येथून ट्रेन मिळते. रेल्वे आता आणखी वाढ करीत आहे. रेल्वे अनेक दुर्गम भागात जाण्यासाठी मार्ग बांधत आहे. 1875 मध्ये मथुरा जंक्शनवर प्रथम ट्रेन सुरु झाली. येथून सात मार्गावर ट्रेन जाते. ज्यात पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे सर्व दिशांचा समावेश आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओदिशा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह अनेक राज्यातील ट्रेन मथुरावरुन जाते. मथुरा जंक्शनवर दहा प्लॅटफॉर्म आहेत. दिवसरात्र येथे ट्रेनचे येणे जाणे सुरुच असते.

मथुरा जंक्शनवर रोज 197 ट्रेन थांबतात

इंडीया रेल इन्फोच्या माहीतीप्रमाणे येथे 197 ट्रेनना थांबा आहे. ज्यात राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, गरीबरथ, 57 मेल-एक्सप्रेस, मेमू-डेमू ट्रेन, 6 संपर्क क्रांती, 114 सुपरफास्ट ट्रेन येथून जातात. येथून 13 ट्रेन आपला प्रवास सुरु करतात. मथुरा जंक्शन येथून कोणत्याही भागासाठी ट्रेन मिळते.