Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता वीजबिल करा शून्य; जाणून घ्या पीएम सूर्य घर योजनेबाबत A टू Z माहिती

भारत सरकारने सुरू केलेल्या पीएम सूर्य घर योजनेत सहभागी होऊन तुम्ही घरासाठी वीज निर्माण करू शकता आणि तुमचं विजेचं बिल शून्य करू शकता

आता वीजबिल करा शून्य; जाणून घ्या पीएम सूर्य घर योजनेबाबत A टू Z माहिती
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2025 | 9:51 PM

भारत सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेच्या अंतर्गत, तुम्ही तुमच्या घराचं विजेचं बिल शून्य करू शकता. या योजनेद्वारे सरकार लोकांना मोफत वीज पुरवते. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे समजून घेऊया.

उन्हाळ्याचा हंगाम आला आहे आणि त्यामुळे सर्वांच्या घरी एसी, कुलर आणि दिवसभर पंखे चालू आहेत. यामुळे विजेचं बिल वाढू लागलं आहे. मात्र, भारत सरकारने एक अशी योजना आणली आहे, ज्याद्वारे तुमच विजेचे बिल शून्य येऊ शकते. या योजनेस “पीएम सूर्य घर – मोफत वीज योजना” असं म्हटलं जातं. सरकारच्या या योजनेद्वारे तुम्ही घरामध्ये सोलर पॅनेल्स वापरून विजेची निर्मिती करू शकता.

सोलर पॅनेल्सच्या मदतीने विजेचं बिल होईल शून्य

भारत सरकारने 2024 मध्ये “पीएम सूर्य घर योजना” सुरू केली आहे, ज्याचा मुख्य उद्दिष्ट विजेचं बिल शून्य करणं आहे. या योजनेअंतर्गत सरकार घरांमध्ये सोलर पॅनेल्स लावते, ज्यामुळे घरामध्ये वीज निर्मिती होऊ शकते. सरकार या पॅनेल्सवर सबसिडी देते, ज्यामुळे त्यांची किंमत कमी होते. या पॅनेल्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरासाठी वीज निर्माण करू शकता, ज्यामुळे तुमचं विजेचं बिल कमी होण्यास मदत होते.

पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांच्या खर्चावरही बचत होते

सोलर पॅनेल्सद्वारे तुम्ही फक्त विजेचं बिलच कमी करू शकत नाही, तर तुम्ही अतिरिक्त वीज निर्माण करून ती विकून पैसे देखील कमवू शकता. यामुळे इतर इंधनाच्या खर्चावरही बचत होते आणि तुम्हाला आणखी फायदेशीर ठरू शकते. या योजनेद्वारे तुमच्या विजेच्या बिलात मोठी बचत होऊ शकते आणि पर्यावरणासही फायदेशीर ठरू शकते.

पीएम सूर्य घर योजनेवर मिळणारी सबसिडी आणि अर्ज कसा करावा?

भारत सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत सोलर पॅनेल्सवर वेगवेगळ्या प्रकारची सबसिडी दिली जाते. उदाहरणार्थ, 1 किलोवॉट सोलर सिस्टम लावल्यास तुम्हाला 30,000 रुपयांची सबसिडी मिळते, तर 3 किलोवॉट सोलर पॅनेल कनेक्शनवर 78,000 रुपयांची सबसिडी दिली जाते.

पीएम सूर्य घर योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करावा?

या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाइट pmsuryaghar.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

पीएम सूर्य घर योजनेचे फायदे

पीएम सूर्य घर योजनेद्वारे तुम्ही तुमच्या विजेच्या बिलात मोठी बचत करू शकता आणि सोलर पॅनेल्सचा वापर करून पर्यावरणाला देखील फायदेशीर ठरू शकता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.