ट्रान्सजेंडर लोक कधीच मुलं जन्माला घालू शकत नाहीत, मुल जन्माला घातल्याचा त्यांचा दावा खोटा असल्याचा या नेत्याने केला आरोप
केरळच्या एका ट्रान्सजेंडर कपलने बाळाला जन्म दिला आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये राहणाऱ्या जिया आणि जहाद या ट्रान्स कपलने आपल्याला मुल झाल्याची बातमी दिली आहे. या अनोख्या प्रकरणाची देशभर चर्चा होत असताना एका नेत्याने वेगळाच आरोप केलाय
केरळ : केरळ येथील एका ट्रान्सजेंडर ( Transgender ) दाम्पत्याने मुलाला जन्म घातल्याची बातमी देशभरात चर्चेत आली आहे. मात्र या बातमीवर केरळचे ( KERALA ) आमदार एम.के.मुनीर यांनी संताप व्यक्त करीत जे लोक म्हणतात ट्रान्सजेंडर लोक मुलं जन्माला घालू शकतात ते मुर्ख आहेत. ट्रान्सजेंडर लोक कधीच मुलं जन्माला घालू शकत नाहीत, हे दाम्पत्य सर्वाना मुर्ख बनवित आहे असेही इंडीयन युनियन मुस्लीम लीगचे ज्येष्ठ नेते, केरळचे आमदार ( MLA ) एम.के.मुनीर यांनी म्हटले आहे.
केरळच्या एका ट्रान्सजेंडर दाम्पत्याने त्यांनी मुल जन्माला घातल्याचा दावा केला आहे. त्यांनी आपल्या मुलाचा जन्मही सुखरूप झाला असल्याचे म्हटले आहे. जिया पॉल आणि जहाद या ट्रान्सजेंडर दाम्पत्याने मुलाला जन्म दिल्याचे जाहीर केल्यानंतर हे दाम्पत्य अचानक प्रकाश झोतात आले आहे. जहाद एक ट्रान्सजेंडर असून त्याची लिंग परीवर्तनाचा उपचार सुरू असताना त्याने ही मुलाला जन्म देण्यासाठी ही थेरेपी थांबविल्याचा दावा केला आहे. गेल्या आठ फेब्रुवारीला जहाद याने केरळच्या एका रूग्णालयात मुलाला जन्म दिला आहे.
या संदर्भात खुप उलट सुलटच चर्चा सुरू आहे. त्यातच मुस्लीम नेते एम. के.मुनीर यांनी नवे स्टेटमेंट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ट्रान्सजेंडर कधी मुलं जन्माला घालू शकत नाहीत. मुला जन्म घालण्यासाठी गर्भाशय असण्याची गरज आहे.
विसडम इस्लामिक परिषदेत बोलताना एम.के.मुनीर यांना सांगितले की ज्याने मुलाला जन्म दिला आहे. ती वास्तविक महिला असून तिने पुरूषांसारखे दिसण्यासाठी आपले स्तन शस्रक्रिया करून हटवले आहेत. मुलाचा जन्म होण्यासाठी गर्भाशयाची गरज असते. त्यामुळे ही गोष्ठ स्पष्ठ होते की ती वास्तविक महिलाच आहे. मुलाचा जन्म होण्यासाठी शुक्राणूचे स्री बिजाशी फर्टीलाईज होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
ट्रान्सजेंडर दाम्पत्याने म्हटले आहे की सरकारी रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी जहादने मुलाला जन्म दिला आहे, परंतू त्यांची इच्छा आहे की मुलाच्या बर्थ सर्टीफिकेटवर त्याचे नाव आई ऐवजी वडील म्हणून नोंदविण्यात यावे. तसेच आईच्या नावाच्या रकान्यात जिया हीचे नाव देण्यात यावे. जन्मावेळी जहाद एक महीला होती. तर जिया पवल एक पुरूष होते. त्या दोघांनी लिंग परिवर्तनासाठी ऑपरेशन केले आहे. परंतू जहाद याने मुलाला जन्म देण्यासाठी तात्पुरते हे ऑपरेशन थांबवले होते. लिंग परिवर्तन मानवजातीसाठी धोकादायक आहे. या संम्मेलनात एक प्रस्ताव पारीत करीत महिलांना लिंग परिवर्तनापासून रोखावे असा निर्णय घेण्यात आल्याचे एम.के.मुनीर यांनी म्हटले आहे.