West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेस 80 वर्षांवरील नेतेमंडळींना ‘मार्गदर्शक मंडळा’त पाठवणार!

आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आमदारांना तिकीट दिलं जाणार नाही, असा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक समितीनं घेतला आहे.

West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेस 80 वर्षांवरील नेतेमंडळींना 'मार्गदर्शक मंडळा'त पाठवणार!
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 5:04 PM

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं एक मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून 80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या आमदारांना तिकीट दिलं जाणार नाही, असा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक समितीनं घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चला विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात एकूण 8 टप्प्यात मतदान पार पडेल. तर निकाल 2 मे रोजी लागणार आहे.(TMC decides no tickets for MLAs above 80 years of age)

काँग्रेस आणि कम्यूनिस्ट पक्षांवर हल्लाबोल

तृणमूल काँग्रेसनं सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस आणि कम्यूनिस्ट पक्षावरही जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं (CPM)अनेक पक्षांसोबत आघाडी केली. त्यावर तृणमूल काँग्रेसनं आता काँग्रेस आणि CPM हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष राहिले नसल्याची टीका केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांच्यावरही हल्ला चढवला.

तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर धार्मिक वातावरण बिघडवण्याला आरोप सातत्याने केला जातो. मात्र सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत TMCने काँग्रेस आणि CPM वरही धार्मिक राजकारण केल्याचा आरोप केला आहे. या पक्षांचं खरं रुप आता सर्वांसमोर आल्याचा आरोप TMCकडून करण्यात आला आहे.

ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगावरही आरोप

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यांमधील मतदान 3 टप्प्यांमध्ये विभागल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोयीनुसार केलंय का? असा सवालही केला. “मी निवडणूक आयोगाचा आदर करते, मात्र त्यांनी जिल्ह्यांची विभागणी का केली? पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी 3 टप्प्यात मतदान विभागण्यात आलंय. हे मोदी शाहांच्या सोयीनुसार करण्यात आलंय का?” असा सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या :

निवडणूक आयोगाने मोदी शाहांच्या सोयीनुसार टीएमसीचे बालेकिल्ले विभागले का? : ममता बॅनर्जी

बिहारच्या ‘तीळकूटा’चे बंगाली मिठाईशी गूळपीठ? ममता बॅनर्जी-तेजस्वी यादव भेट होणार

TMC decides no tickets for MLAs above 80 years of age

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.