नवी दिल्ली : त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री विप्लव देव (Biplab Kumar Deb resigns) यांनी राजीनामा दिला आहे. 8 महिन्यांनंतर राज्यात निवडणुका होणार आहेत. देव हे चार वर्षांपासून राज्याचे नेतृत्व करत होते. भाजपा, इंडिजिनस पीपुल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या सरकारचा चार वर्षांचा कारभार त्यांनी केला. राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राज्यपालांकडे देव यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. राज्यात आठ महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांपूर्वी नेतृत्व बदलण्याचा निर्णय भाजपाने केलेला दिसतोय. 2023च्या निवडणुकांपूर्वी (Tripura Elecitons) हा मोठा निर्णय मानण्यात येतो आहे. विप्लव देव यांची शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी भेट झाली होती. दरम्यान केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे अगरतलाला पोहचले आहेत. राज्यातील आमदारांची बैठक संध्याकाळी 5 वाजता होणार आहे, त्या बैठकीत ते सहभागी होतील. याच बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाववर शिक्कामोर्तब होणार आहे.
Tripura Chief Minister Biplab Kumar Deb resigns.
हे सुद्धा वाचा(File pic) pic.twitter.com/1WqdEiQqYC
— ANI (@ANI) May 14, 2022
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पक्षाचा निर्णय आपल्यासाठी सर्वोपरि आहे. हायकमांडच्या सांगण्यावरून त्यांनी आपले पद सोडले. नवा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.
बिप्लव देव यांच्याबाबत पक्ष संघटनेत नाराजी आहे. दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यात पुढील वर्षी 2023 मध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. गुजरातच्या धर्तीवर त्रिपुरामध्ये मंत्री ते संघटनेत मोठे फेरबदल होऊ शकतात. राजीनामा दिल्यानंतर ते संघटनेतील कोणतेही पद स्वीकारू शकतात.
महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही या राजकीय घडामोडीतील एक वेगळेपण आहे. येत्या काही महिन्यात निवडणुका पार पडणार असल्यामुळे आता तावडे त्रिपुराची कमान कशी संभाळणार? याकडेही राजकीय नजरा लागल्या आहेत. मात्र भाजप नेते विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकीटही देण्यात आले नव्हते. त्यानंतर आता त्यांच्यावर त्रिपुरात मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे.