नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव (Biplab Deb) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता डॉ. माणिक साहा हे त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत डॉ. माणिक साहा (Dr. Manik Saha) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बिप्लव कुमार देव यांनी शनिवारी दुपारी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक (Legislative Party Meeting) पार पडली. या बैठकीत डॉ. माणिक साहा यांच्या नावावर एकमत झालं. आता बिल्पब कुमार देव यांच्या खांद्यावर त्रिपुरा भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्रिपुरामध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत 13 ठिकाणी भाजपला विजय मिळाला. त्याचं श्रेय माणिक साहा यांना दिलं जातं. महत्वाची बाब म्हणजे साहा यांच्या खांद्यावर त्रिपुराची जबाबदारी अशावेळी देण्यात आलीय जेव्हा विधानसभा निवडणुकीला 1 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे.
Manik Saha will be the new Chief Minister of Tripura, Union Minister & BJP central observer, Bhupender Yadav tweets pic.twitter.com/23QMfdn4if
— ANI (@ANI) May 14, 2022
Welcomed National General Secretary of @BJP4India Shri @TawdeVinod Ji and State Prabhari Shri @BJPVinodSonkar Ji at MBB Airport,today. pic.twitter.com/PFWx8cipUw
— Dr Manik Saha (@DrManikSaha2) May 14, 2022
त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेले माणिक साह हे कधीकाळी काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते होते. 2016 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने चार वर्षे त्यांचं काम पाहिलं. त्यांची मेहनत लक्षात भाजपने 2020 मध्ये त्यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर महापालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळवून दिलं. आता त्यांच्या खांद्यावर त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान आता त्यांच्यासमोर असणार आहे.
#WATCH | Former Tripura CM Biplab Kumar Deb felicitated Manik Saha, who will be the new Chief Minister of the state pic.twitter.com/yI2NXKyciQ
— ANI (@ANI) May 14, 2022
महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही या राजकीय घडामोडीतील एक वेगळेपण आहे. येत्या काही महिन्यात निवडणुका पार पडणार असल्यामुळे आता तावडे त्रिपुराची कमान कशी संभाळणार? याकडेही राजकीय नजरा लागल्या आहेत. मात्र भाजप नेते विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकीटही देण्यात आले नव्हते. त्यानंतर आता त्यांच्यावर त्रिपुरात मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे.