‘तुमचीही आठवण येईल’ म्हणणाऱ्या ट्रोलरला जेव्हा सुषमा स्वराज यांनी दिलेलं शांतपणे उत्तर!

सुषमा स्वराज यांनी दिल्ली भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ट्वीट केलं होतं. त्याला इरफान खान नावाच्या यूझरने 'तुमचीही एक दिवस अशीच खूप आठवण येईल. शीला दीक्षित यांच्याप्रमाणे' असा रिप्लाय दिला होता.

'तुमचीही आठवण येईल' म्हणणाऱ्या ट्रोलरला जेव्हा सुषमा स्वराज यांनी दिलेलं शांतपणे उत्तर!
Follow us
| Updated on: Aug 07, 2019 | 9:02 AM

मुंबई : दिल्लीचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष मांगे राम गर्ग यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. त्यावेळी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांना उद्देशून ‘तुमचीही अशीच एक दिवस आठवण येईल’ असं ट्वीट करणाऱ्या ट्रोलरला सुषमा यांनी शांतपणे उत्तर दिलं होतं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यानंतर अवघ्या 18 दिवसांतच सुषमा स्वराज यांचंही अकस्मात निधन झालं.

भाजप आमदार राहिलेल्या मांगे राम गर्ग यांचं 21 जुलै 2019 रोजी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुषमा स्वराज यांनी ट्वीट केलं होतं. ‘श्री मांगे राम गर्ग यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. ते भारतीय जनता पक्षाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने पक्षाची अपरिमित हानी झाली आहे’ अशा आशयाचं ट्वीट सुषमा यांनी केलं होतं.

सुषमा यांच्या ट्वीटला इरफान खान नावाच्या यूझरने रिप्लाय दिला होता. ‘तुमचीही एक दिवस अशीच खूप आठवण येईल. शीला दीक्षित यांच्याप्रमाणे, अम्मा’ असं अभद्र ट्वीट इरफानने केलं होतं. खरं तर, या ट्वीटवर ट्विटराईट्सनी इरफानचा यथेच्छ समाचार घेतला होता. मात्र सुषमा स्वराज यांनी त्याला अत्यंत शांतपणे उत्तर दिलं होतं.

‘या भावनांसाठी तुम्हाला धन्यवाद. या सद्विचारांसाठी मी तुमचे आधीच आभार मानते’ असं सुषमा ट्विटरवर म्हणाल्या होत्या. दुर्दैव म्हणजे अवघ्या काही दिवसांतच सुषमा स्वराज यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान नावाच्या यूझरने हे ट्वीट नंतर डीलीट केलं आहे.

सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.

सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.

सुषमा स्वराज (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019) यांची संपूर्ण कारकीर्द

2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री

मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री

2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या

जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री

जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री

ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री

मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)

मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)

संबंधित बातम्या :

रात्री 8.50 वा. फोन झाला, सुषमा स्वराज यांनी उद्या 1 रुपये फी घेण्यासाठी बोलावलं होतं, हरीश साळवेंना धक्का

सुषमाजी, तुम्हाला देश कधीही विसरणार नाही : नरेंद्र मोदी

विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द

Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!

57 मुस्लिम देशांसमोर सुषमा बरसल्या होत्या, भारत गांधींचा देश, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते!

Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

‘तुमचीही आठवण येईल’ म्हणणाऱ्या ट्रोलरला जेव्हा सुषमा स्वराज यांनी दिलेलं शांतपणे उत्तर!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.