TV9 फेस्टीव्हल ऑफ इंडिया 2024: पाचवा दिवस गाजला, अंतिम पूजा, सिंदुर खेला तसेच मनोरंजक कार्यक्रमाची मेजवानी
दिल्लीत पाच दिवसीय TV9 फेस्टीव्हल ऑफ इंडिया 2024 मध्ये दसऱ्याच्या दिवशी शनिवारी मोठा उत्साह होता. गरबा नाईटमध्ये प्रसिद्धी हस्तींचा सहभाग आणि अनेक रंगारंग कार्यक्रमाची रेलचेल होती
नवरात्र आणि दसरा सणाच्या निमित्ताने पाच दिवसीय TV9 फेस्टीव्हल ऑफ इंडिया 2024 चे आयोजन दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये सुरु आहे. पाचव्या आणि अंतिम दिवशी खास उत्साह पाहायला मिळाला.या दिवसाची सुरुवात विधीवत पूजा करण्याने झाली.गेल्या चार दिवसांपासून या उत्सवात देशातील अनेक मोठ्या हस्तींनी सहभाग घेत आनंद घेतला. फेस्टीव्हलच्या शेवटच्या दिवशी आज रविवारी (13 ऑक्टोबर ) रोजी सकाळी नऊ वाजाता पारंपारिक पूजेला सुरुवात झाली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाचवा दिवसाचे मुख्य आकर्षण आनंदमय सिंदूर खेलाचे आयोजन हे होते. हा सिंदूर खेला दुर्जा पूजेच्या समाप्तीचे प्रतिक मानले जाते. यात महिला एकता आणि आशीवार्दाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या उत्सवात एकमेकांनी सिंधुर लावतात.
दिल्ली – एनसीआर येथील रहिवाशांनी मोठ्या संख्येने या सहभाग घेतला. या उत्सवात उत्तर प्रदेशातील उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक देखील सामील झाले होते. गरबा नाईटमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. लोक गरबात पारंपारिक संगितावर बॉलीवूड धूनवर अनेकांची पावले थिरकली.
अनेक दिग्गज हस्ती सामील
टीव्ही 9 फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 च्या वार्षिक सोहळ्यात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांचे पती आशीष पटेल देखील यात सहभागी झाले होते. या फेस्टीव्हलमध्ये अनेक दिग्गज सामील झाले होते. आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि कॉंग्रेसचे नेते पवन खेडा सामील होते. यावेळी टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास देखील हजर होते. भाजपाचे नेते खासदार मनोज तिवारी यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन मॉं दुर्गाचा आशीवार्द घेतला. त्यांनी या शानदार कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल टीव्ही 9 नेटवर्कचे आभार देखील मानले.
फेस्टीव्हलमध्ये 250 हून अधिक स्टॉल
टीव्ही 9 फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 मध्ये नवरात्री आणि दसरा सणाचा आनंद घेणाऱ्यासाठी भारतीय आणि विदेशी खाद्यपदार्थांचे 250 हून अधिक स्टॉल लावले होते. येथे सहभागी लोक विविध पदार्थांवर ताव मारताना दिसले. येथे बिहारचा प्रसिद्ध लिट्टी-चोखा सोबत राजस्थानपासून पंजाबपर्यंतचे खाद्यपदार्थांचा समावेश होता. लखनवी कबाब आणि दिल्लीतील प्रसिद्ध चाट याचा आनंद घेताना दिल्लीकर मंत्रमुग्ध झाले.
या फेस्टीव्हलमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात विविध सांस्कृतिक परंपराची झलक पाहायला मिळाली. येथील व्यासपीठावर अनेक कलाकार बंगालच नाही पंजाब आणि गुजरातच्या कलाकारांनी अनेक पारंपारिक नृत्य सादर करीत प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध केले. नवरात्रीत लोकांनी गरबा गीतांवर मंत्रमुग्धपणे बेधुंद आनंद मिळविला.