दिवसभरातील मोठ्या बातम्या – 10 जानेवारी
नवी दिल्ली सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज अयोध्या प्रकरणावर सुनावणी, राजकारण्यांसह देशाचं सुनावणीकडे लक्ष नवी दिल्ली सवर्ण आरक्षण विधेयकावर राज्यसभेतही शिक्कामोर्तब, दोन्ही सभागृहांमध्ये 124 व्या घटनादुरुस्तीला मंजुरी, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायदा लागू होणार मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम, बैठकांचं सत्र सुरु, बस नसल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची लूट नवी दिल्ली आघाडीबाबत शरद पवार आणि […]
नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज अयोध्या प्रकरणावर सुनावणी, राजकारण्यांसह देशाचं सुनावणीकडे लक्ष
नवी दिल्ली
सवर्ण आरक्षण विधेयकावर राज्यसभेतही शिक्कामोर्तब, दोन्ही सभागृहांमध्ये 124 व्या घटनादुरुस्तीला मंजुरी, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायदा लागू होणार
मुंबई
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम, बैठकांचं सत्र सुरु, बस नसल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची लूट
नवी दिल्ली
आघाडीबाबत शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीत 25-23 फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती, दोन जागांचा पेच कायम
यवतमाळ
लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यामुळे नव्या उद्घाटकाचा शोध सुरु, मराठी साहित्य महामंडळाची आज बैठक
मुंबई
मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता, जाहिरातीचा बोर्ड लावण्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून दोन तास वाहतूक बंद राहणार
पुणे
पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं, पुणेकरांना 1350 एमएलडी पाणी मिळणार, महापौर आणि पालकमंत्र्याच्या बैठकीत निर्णय