Twin Towers : ट्विन टॉवर कोसळले आता धुळीचा धोका, काय आहे उपाययोजना?

या टॉवर परिसरातील ज्या नागरिकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी अधिकची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विनी कांत्रू यांनी सांगितले आहे. या धुळीमुळे अशा रुग्णांना अधिकचा त्रास होऊ शकतो. तर निरोगी व्यक्तीलाही खोकला, धाप लागणे तर या प्रदूषणामुले श्लेष्माची देखील समस्या निर्माण होऊ शकते असे कांत्रू यांनी सांगितले आहे.

Twin Towers : ट्विन टॉवर कोसळले आता धुळीचा धोका, काय आहे उपाययोजना?
धुळीमुळेही आजार होऊ शकतात.
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 3:27 PM

मुंबई : अखेर बहुचर्चीत असलेली (Twin Towers Demolition) ट्विन टॉवर ही इमारत अवघ्या काही सेकंदामध्ये भुईसपाट झाली आहे.  (Supreme Court) सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रविवारी दुपारी ठिक 2:30 च्या दरम्यान स्फोटकाच्या सहाय्याने ही इमारत पाडण्यामध्ये यश आले आहे. डिस्ट्रॉलेशन फर्म एडिफिस इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे टॉवर खाली कोसळण्यासाठी 3 हजार 500 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. हे टॉवर पाडले म्हणजे सर्वकाही मिटले असे नाहीतर याचे परिणाम काही दिवस तरी राहणार आहे. आता पडलेले ढिगारे उचलण्यासाठीच तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यामुळे जे (Dusty lots) धुळीचे लोट निर्माण झाले होते ते सुद्धा मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. येथील धूळ ही श्वसन रोगांना कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो असा अंदाज आहे.

धुळीमुळे दमही लागू शकतो

या टॉवर परिसरातील ज्या नागरिकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी अधिकची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विनी कांत्रू यांनी सांगितले आहे. या धुळीमुळे अशा रुग्णांना अधिकचा त्रास होऊ शकतो. तर निरोगी व्यक्तीलाही खोकला, धाप लागणे तर या प्रदूषणामुले श्लेष्माची देखील समस्या निर्माण होऊ शकते असे कांत्रू यांनी सांगितले आहे. तर “धुळीमुळे दम्याची लक्षणे वाढण्याची शक्यता जास्त असते. जे लोक नियमितपणे दम्याचे पंप वापरत नाहीत त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते.” अशाप्रकराच्या उंच इमारती पाडल्यानंतर त्या भागातील नागरिकांमध्ये दम्याच्या आजार हा आढळून येतोच. वायू प्रदूषणामुळेही येथील नागरिक हे त्रस्त असातात.

बुरशीजन्य संसर्गात देखील वाढ

धुळीमुळे दम्याचा त्रास तर होतोच पण श्वसनांच्या आजाराबरोबर ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना बुरशीजन्य संसर्ग देखील होऊ शकतो असेही डॉ. विनी कांत्रू यांनी सांगितले आहे. जुन्या इमारती फोडण्याशी संबंधित धुळीच्या धोक्यांपैकी एक म्हणजे हिस्टोप्लाझ्मोसिस, बुरशीच्या बीजाणूंचा श्वास घेतल्यामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग. जेव्हा डिमोलीझ केले जाते, तेव्हा बुरशीचा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम होतो, जरी त्याची लक्षणे खूप वेगळी असल्याचेही कांत्रू यांनी स्पष्ट केले आहे. बुरशीच्या बीजाणूंचा श्वास घेतल्यामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग. जेव्हा डिमोलीझ केले जाते, तेव्हा बुरशीचा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम होतो, त्यामुळे छातीत दुखणे, खोकला, डोकेदुखी, भूक न लागणे, श्वास लागणे, सांधे आणि स्नायू दुखणे, थंडी वाजणे यांचा समावेश असू शकतो

काय आहे उपाययोजना?

धुळीच्या त्रासापासून स्वत:ला दूर ठेवायचे असेल तर आता ट्विन टॉवर च्या परिसरापासून काही दिवस दूर राहणे गरजेचे आहे. शिवाय त्या इमारतीपासून जवळपास असणाऱ्या नागरिकांनी कायम आपल्या घराची दारे-खिडक्या ही बंद ठेवणे गरजेचे आहे. आवश्यक असेल तेव्हाच खिडक्या आणि दारे उघडावीत असा सल्लाही देण्यात आले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.