कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन मोदींवर टीका, केंद्राच्या मागणीनंतर अनेक ट्विट्स हटवले

भारतातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचा आरोप करत मोदींवर टीका करणारे काही ट्विट्स हटवण्यात आले आहेत.

कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन मोदींवर टीका, केंद्राच्या मागणीनंतर अनेक ट्विट्स हटवले
Twitter
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 1:05 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने याबाबत मागणी केल्यानंतर ट्विटर इंडियाने अशी 50 ट्विट्स हटवले आहेत. भारतातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचा आरोप करत टीका करणारे ट्विट्स हटवल्याचा आरोप होतोय. यात मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीपासून त्यांची तुलना निरो राजाशी करणं आणि कुंभमेळ्याला परवानगी देण्यावरुन केलेल्या ट्विट्सचा समावेश आहे. यात आमदार, खासदार, पत्रकार आणि सेलिब्रेटिंच्या ट्विट्सचाही समावेश आहे (Twitter taken downs some tweets criticizing Modi over handling of Covid 19 situation).

केंद्र सरकारने कोविड परिस्थिती हाताळण्यावरुन टीका करण्यात आलेले काही ट्विट्स भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यांचं उल्लंघन करत असल्याचं सांगत ट्विटरला ट्विट्स हटवण्यास सांगितले होते. त्यानंतर ट्विटरने संबंधित ट्विट करणाऱ्यांना नोटिफिकेशन देत भारतापुरते हे ट्विट्स हटवले आहेत.

कोणत्या दिग्गजांचे ट्विट्स हटवले?

ट्विटरने हटवलेल्या ट्विट्समध्ये व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंट्सचाही समावेश आहे. यात काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी, पवन खेरा, पश्चिम बंगालमधील मंत्री मोली घटक, चित्रपट निर्माते अविनाश दास, पत्रकार आणि निर्माते विनोद कापरी अशा अनेकांचे ट्विट्स हटवण्यात आलेत. मोली दास यांच्या हटवण्यात आलेल्या ट्विटमध्ये झोपडीत झोपलेल्या रुग्णाचा फोटो ट्विट करत तो तापी जिल्ह्यातील असल्याचा दावा केला होता. तसेच हे गुजरातच्या आरोग्य व्यवस्थेचं प्रातिनिधिक चित्र असल्याचा आरोप केला होता.

केंद्र सरकारच्या मागणीनंतर ट्विटरने हटवण्यात आलेल्या बहुतांश ट्विट्समध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन पंतप्रधान मोदींवर प्रखर टीका केलेली होती. तसेच कठोर प्रश्न विचारण्यात आले होते.

ट्विटरने ट्विट्स हटवल्यानंतर भारतात जोरदार प्रतिक्रिया

भारतात कोरोनाने थैमान घातलंय. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांनी 3 लाखांचा टप्पा पार केलाय. त्यात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यांचा तुटवडा झाल्याचीही स्थिती तयार झालीय. अनेक ठिकाणी रुग्णांना बेडही मिळत नसल्याची परिस्थिती तयार झालीय. अशातच दररोज कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही 2000 च्या वर गेलीय. त्यावरुनच विरोधकांसह पत्रकारांकडूनही मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ले करण्यात येत आहेत. मध्यंतरी मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारा ट्विटर ट्रेंडही झाला. अशातच ट्विटरने काही ट्विट्स हटवल्याने चर्चेला उधाण आलंय.

हेही वाचा :

ट्विटरला बिल्कुल माफ करु नका, त्यांनी भारतात नागरी युद्धाचा कट केलाय, कंगना रणौतचे थेट पंतप्रधानांना साकडं

‘257 ट्विटर अकाऊंट्स विरोधात कारवाई करावीच लागेल’, केंद्र सराकरचं ट्विटरला अल्टिमेटम

अटक आणि दंडाच्या भीतीपोटी केंद्र सरकारने सांगितलेल्या अकाऊंट्सवर ट्विटरची कारवाई

व्हिडीओ पाहा :

Twitter taken downs some tweets criticizing Modi over handling of Covid 19 situation

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.