दोन मित्रं छतावर एकमेकांना गुदगुल्या करायला गेले आणि पुढं जे घडलं त्यानं दिल्ली हादरली

कंपनीच्या छतावर गेलेल्या दोन मित्रांचा खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली. ( terrace falling friends died)

दोन मित्रं छतावर एकमेकांना गुदगुल्या करायला गेले आणि पुढं जे घडलं त्यानं दिल्ली हादरली
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 7:49 AM

नवी दिल्ली : प्रमाणापेक्षा जास्त दंगा-मंस्ती आणि मजाक कधी-कधी जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. काम केल्यानंतर कंपनीच्या छतावर जेवण करताना दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. एकमेकांना गुदगुल्या करताना तोल जाऊन दोघेही छतावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडताच कंपनीतील इतर कामगारांनी या दोन्ही मित्रांना  रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचाही रस्त्यातच मृत्यू झाला. शफीक आणि शकील असं या मृत मित्रांचं नाव आहे. (Two friends mocking each other has been dead due to falling down from terrace)

घटना काय ?

दिल्लीमधील गीता कॉलिनिमधील एका खासगी कंपनीत दोन मित्र सोबत काम करत होते. काम केल्यांनतर दोघेही कंपनीच्या छतावर जेवायला गेले. यावेळी जेवताना ते थट्टा-मस्करी करत होते. यावेळी एक मित्र दुसऱ्या मित्राला गुदगुल्या करत होता. मात्र याच वेळी दोघांचाही तोल गेल्याने ते छतावरून खाली पडले. हा प्रकार लक्षात येताच बाकीच्या कमगारांनी घटनास्थाळी धाव घेतली. इतर कामगारांनी या दोन्ही मित्रांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचाही रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू झाला.

दोघेही चांगले मित्र

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कामगार एकमेकांचे चांगले मित्र होते. शफिकचे लग्न झालेले असून तो आपल्या परिवारासोबत जाफराबाद येथे राहतो. तर शकीलसुद्धा त्याच्या घराच्या जवळच राहत होता. दोघांचेही एकमेकांच्या परिवाराशी चांगले संबंध होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

दरम्यान, दोघांच्या मृत्यूमुळे दिल्लीमधील गीता नगरातील नागरिकांना धक्का बसला आहे. या घटनेची नोदं दिल्ली पोलिसांनी केली आहे. दोघांचाही मृत्यू गुदगुल्या करण्यामुळे झाला, की यामागे काही घातपात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

हातातला घट्ट मोबाईल उलगडणार खूनाचं रहस्य? इचलकरंजीची घटना पोलिसांसाठी आव्हान

महिलांच्या बेडरुममध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य; वाचून तुम्हीही हादराल

लग्नानंतर अनैतिक संबंधात आला पैसा, प्रेयसीच्या एका हट्टामुळे रंगला खूनी खेळ

(Two friends mocking each other has been dead due to falling down from terrace)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.