Omicron Update | कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

| Updated on: Dec 02, 2021 | 6:27 PM

Karnatak Omicron News | देशात ओमिक्रॉनचे (Omicron)  दोन रुग्ण सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Omicron Update | कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
MOICRON KARNATAKA
Follow us on

Omicron Latest Update  : देशात ओमिक्रॉनचा (Omicron) अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.

दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु

कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढे आहेत. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापैकी एकाचं वय 66 असून दुसरा व्यक्ती 46 वर्षाचा आहे.

जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव

गेल्या एक महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्येच 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. देशातील इतर रुग्णांच्या संख्येने हा आकडा 55 टक्के इतका आहे. 49 टक्के लोकांना कोरोनाचे डोस दिल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याचं दिसून आल्याचं केंद्राचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कर्नाटक-महाराष्ट्राचं आफ्रिका कनेक्शन

महाराष्ट्रात आफ्रिकेतून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉननं हाहाकार माजवलाय. तिथं दिवसाला कमीत कमी 4 हजार रुग्ण सापडतायत. सध्या तिथली रुग्णांची संख्या 10 हजाराच्या वर गेलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या बहुतांश प्रांतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडतायत. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात आफ्रिकेतून आलेल्या आणि येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे. फक्त दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर आफ्रिकन देशातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढतायत. त्यात मोझंबिक, बोत्सवाना, झिम्बाब्वे अशा देशांचा समावेश आहे.

omicron

इतर बातम्या :

VIDEO: यूपीए कुठे अस्तित्वात आहे?; आता राऊत म्हणतात, एनडीए तरी कुठं अस्तित्वात आहे?

नशीबच पालटलं! IIT च्या विद्यार्थ्याला उबरकडून थेट 2 कोटींपेक्षा जास्त पगाराची ऑफर

कृषिमंत्र्यांचे विमा कंपन्यांना ‘अल्टीमेटम’ : आठवड्याभरात शेतकऱ्यांनी केलेले दावे निकाली काढा