केंद्रीय मंत्र्यांना आला व्हॉट्सॲप कॉल आणि घडलं भलतंच, तसा व्हिडीओ प्ले होताच…

देशात गेल्या काही दिवसांपासून सेक्सटॉर्शनच्या घटना वाढल्या आहेत. यात केंद्रीय मंत्र्यांनाही टार्गेट केलं जात आहे. अशीच एक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

केंद्रीय मंत्र्यांना आला व्हॉट्सॲप कॉल आणि घडलं भलतंच, तसा व्हिडीओ प्ले होताच...
व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांसोबत केलं असं काही, त्या व्हिडीओमुळे थेट गाठलं पोलीस ठाणं
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 4:11 PM

मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन गंडा घालण्याची अनेक गुन्हे गेल्या काही वर्षात उघड झाले आहेत. असं असताना आता व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून सेक्सटॉर्शनची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अश्लिल व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केलं जात आहे. आता गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की, त्यांच्या रडावर केंद्रीय मंत्री आले आहेत. अशीच एक घटना जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्यासोबत घडली आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या सर्राईत गुन्हेगारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना व्हॉट्सॲप कॉल केला आणि अश्लिल व्हिडीओ दाखवला. या नंतर त्यांनी तात्काळ फोन कट केला.

नेमकं काय झालं या प्रकरणात?

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी याबाबतची माहिती तात्काळ दिल्ली क्राईम ब्रांचला दिली. त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरली आणि या प्रकरणाची धागेदोरे राजस्थानच्या भरतपूरपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना अटक केली. पकलेल्या आरोपींची नाव मोहम्मद वकील आणि मोहम्मद साहिब अशी आहेत.

दोन्ही आरोपी सेक्सटॉर्शन कॉल करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचं समोर आलं आहे. तसेच या प्रकरणातील मास्टरमाईंड साबिर फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी आता सापळा रचला आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोकांना पहिल्यांदा व्हिडीओ कॉल केला जातो आणि त्यानंतर अश्लिल व्हिडीओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “तपास यंत्रणांच्या माहितीनुसर एका सिमचा वापर 36 इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबरसाठी केला होता. तर दुसऱ्याचा वापर 18 आयएमआय नंबरसाठी केला होता. आरोपींकडून मोबाईल जप्त केला आहे आणि फॉरेंसिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे.”

कठोर कारवाई करण्याची केंद्रीय मंत्र्यांची मागणी

केंद्रीय मंत्र्यांनी तात्काळ कारवाई केल्याने पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच अशा कॉलच्या माध्यमातून कोणी सामन्य व्यक्ती अडकला असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केली आहे.

'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.