माणुसकीची हत्या! वाघाच्या चिमुरड्यांवर दगड भिरकावले, चिमुकल्या बछड्यांचा जीव वाचवताना वाघाची दमछाक
17 मे रोजी सिवनी जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांनी वाघाच्या बछड्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh News) सिवनी जिल्ह्यामधील एका गावात दुर्दैवी घटना समोर आली. एका वाघाच्या बछड्यांवर (Tiger cubs) तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाघाचे दोन्ही बछडे गंभीररीत्या जखमी झाले. मंगळवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सिवनी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी वाघाच्या चिमुकल्या बछड्यांवर तुफान वेगानं दगड भिरकावले. या दगडफेकीनं सैरभेर झालेल्या वाघाच्या बछड्यांना जीव वाचवण्यासाठी कुठे जावं, हे काळीच कळत नव्हतं. वाईट पद्धतीनं वाघाच्या बछड्यांना जखमी करणाऱ्या या ग्रामस्थांच्या मानसिकेतवरच सवाल उपस्थित केले जात आहेत. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओदेखील (Shocking video people attacks Tiger Cubs) समोर आला आहे. कमजोर आणि भयभीत झालेला बछडा जीव वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून आलंय. दगडफेक करणाऱ्या ग्रामस्थांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलाय.
कधीची घटना?
17 मे रोजी सिवनी जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांनी वाघाच्या बछड्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या चिमुकल्या बछड्याचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरु अशल्याचं यावेळी बघायला मिळालं बछड्याला पिटाळून लावण्याच्या उद्देशानं ही दगडफेक केली केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलंय.
वाघाचे दोन बछडे या दगडफेकीत गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. आता या जखमी वाघाच्या बछड्यांना वनविभागाकडून कान्हा अभयारण्यात देखरेखीखाली रेस्क्यू करण्यात आलं आहे. मात्र या दुर्दैवी घटनेप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही प्राणी प्रेमींकडून केली जातेय.
पाहा व्हिडीओ : सौजन्य वाईल्ड सातपुरा
देशातील वाघांची संख्या वाढली पाहिजे, यासाठी एकीकडे वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेनं प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केलाय. या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जातेय.