Delhi Drugs Seized : पोटातील 181 कॅप्सूलमध्ये सापडले 28 कोटींचे कोकेन; दिल्ली विमानतळावर युगांडातून आलेल्या दोघींना अटक

चार दिवसांनंतर, 26 मे रोजी दुसरी महिला युगांडातून आली. संशयावरून तिचीही तपासणी केली असता तिच्या पोटात 101 कॅप्सूल लपविल्याचे आढळून आले. त्यावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे त्या महिलेची चौकशी केली. त्यावेळी महिलेने पोटात कॅप्सूलमध्ये कोकेन लपवल्याचे मान्य केले. महिलेच्या पोटातील कॅप्सूलमध्ये सुमारे 891 ग्रॅम कोकेन होते.

Delhi Drugs Seized : पोटातील 181 कॅप्सूलमध्ये सापडले 28 कोटींचे कोकेन; दिल्ली विमानतळावर युगांडातून आलेल्या दोघींना अटक
पोटातील 181 कॅप्सूलमध्ये सापडले 28 कोटींचे कोकेनImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 3:46 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGIA) दोन महिलांना अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे. या दोन्ही महिला युगांडातून आल्या होत्या. दोघींना विमानतळावर पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांना दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी दोन्ही महिलांच्या पोटातून 181 कॅप्सूल काढल्या. दोन्ही महिलांनी 181 कॅप्सूलमध्ये 2 किलो कोकेन (Cocaine) भरले होते. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 28 कोटी इतकी आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या मुंद्रा बंदरातून तब्बल 500 कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले होते. त्यापाठोपाठ दिल्लीत ही कारवाई करण्यात आली आहे. देशात अमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

एक्सरे आणि वैद्यकीय तपासणीतून तस्करीचे बिंग फुटले!

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी युगांडाची एक महिला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. विमानतळावर उपस्थित अधिकार्‍यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्या संशयातून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या महिलेची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेने पोटात एका कॅप्सूलमध्ये औषध लपवून ठेवल्याचे आढळून आले होते. यानंतर तेथील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी महिलेला आरएमएल रुग्णालयात नेले. हॉस्पिटलमध्ये महिलेच्या पोटाचा एक्स-रे करण्यात आला असता तिच्या पोटात एकूण 80 कॅप्सूल असल्याचे आढळून आले. कॅप्सूल बाहेर आल्यावर सर्व कॅप्सूलमध्ये 957 ग्रॅम कोकेन भरल्याचे आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 14 कोटींहून अधिक आहे.

चार दिवसांनंतर, 26 मे रोजी दुसरी महिला युगांडातून आली. संशयावरून तिचीही तपासणी केली असता तिच्या पोटात 101 कॅप्सूल लपविल्याचे आढळून आले. त्यावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे त्या महिलेची चौकशी केली. त्यावेळी महिलेने पोटात कॅप्सूलमध्ये कोकेन लपवल्याचे मान्य केले. महिलेच्या पोटातील कॅप्सूलमध्ये सुमारे 891 ग्रॅम कोकेन होते. या जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 13 कोटींहून अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

अंमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता

काही दिवसांच्या फरकाने एकापाठोपाठ दोन महिलांचा अंमली पदार्थांच्या तस्करीतील सहभाग उघडकीस आला. त्यामुळे सीमाशुल्क अधिकारी अलर्ट मोडवर आले आहेत. अंमली पदार्थ तस्करीचे नेटवर्क कोण चालवत आहे? तसेच महिलांनी पोटात लपवून आणलेल्या कोकेनची डिलिव्हरी कोठून आणि कोण घेऊन जाणार होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सीमाशुल्क विभागाचे अधिकारी करीत आहेत. यातून तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. (Two Ugandan women arrested at Delhi airport in drug trafficking case, cocaine worth Rs 28 crore seized)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....