Next CJI U U Lalit | सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश ललित होऊ शकतात सरन्यायाधीश, CJI रमणा यांनी केली शिफारस

Next CJI U U Lalit | मूळ सोलापूर इथले न्यायमूर्ती उदय ललित हे देशाचे पुढील सरन्यायाधीश होऊ शकतात. CJI रमणा यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.

Next CJI U U Lalit | सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश ललित होऊ शकतात सरन्यायाधीश, CJI रमणा यांनी केली शिफारस
सोलापूरचे सुपूत्र होणार सरन्यायाधीश Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 1:16 PM

Next CJI U U Lalit | सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश ललित ( U U Lalit ) हे देशाचे पुढील सरन्यायाधीश होऊ शकतात. सध्याचे CJI एन. व्ही. रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या नावाची शिफारस केली आहे. सीजीआय रमणा यांनी कायदा व न्याय मंत्र्यांना शिफारस पत्र सादर केले आहे. न्यायमूर्ती यू .यू. ललित यांच्या नावाची शिफारस मान्य झाल्यास ते देशाचे 49 वे सरन्यायाधीश होतील. 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा (CJI N. V. Ramana) निवृत्त होत आहेत. कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी सीजीआय एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहिले होते. त्यात पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्याची विनंती त्यांनी केली होती. रिजिजू यांचे ३ ऑगस्ट रोजीचे पत्र सायंकाळी उशिरा सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला प्राप्त झाले.

काय आहे परंपरा

परंपरेनुसार निवृत्तीच्या सुमारे एक महिना आधी सरन्यायाधीश पुढील वारसदाराच्या नावाची शिफारस विधी व न्याय मंत्रालयामार्फत राष्ट्रपतींना सीलबंद लिफाफ्यात पाठवतात. या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयातील दोन ज्येष्ठ न्यायाधीशांच्या नावाची सरन्यायाधीशांना शिफारस करता येते. त्याआधारे पुढील सरन्यायाधीशाची निवड करण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतात. सरन्यायाधीश म्हणून कोणतीही निश्चित मुदत नाही. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय घटनेनुसार 65 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

चार महिन्यांत तीन सरन्यायाधीश

अनेक दशकांनंतर सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायमुर्तींना संधी मिळण्याची हा योग जुळून आला आहे. या चार महिन्यांत तीन सरन्यायाधीश देश बघेल. सध्याचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्याव्यतिरिक्त न्यायमूर्ती उदय उमेश ललित आणि न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हेदेखील यावर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत भारताचे सरन्यायाधीश होतील. या रंजक योगायोगानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2027 मध्ये देशातही असाच पुन्हा योगायोग पाहायला मिळणार आहे. 2027 मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांत तीन सरन्यायाधीश देश पाहील.

देशाला मिळेल पहिल्या महिला सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदी, परंपरा आणि प्रथेनुसार न्यायमूर्ती विक्रम नाथ 2027 मध्ये 27 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होतील आणि देशाला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळतील. न्यायमूर्ती बीवी नागरत्ना 35 दिवस देशाचे सरन्यायाधीश असतील. यानंतर न्यायमूर्ती पी.एस.नरसिंह 31 ऑक्टोबर 2027 पासून सहा महिने आणि तीन दिवस सरन्यायाधीश होतील.

2027 पर्यंत इतक्या कमी वेळात तीन सरन्यायाधीश होण्याची ही तिसरी वेळ असेल. सर्वोच्च न्यायालय 1950 मध्ये अस्तित्वात आले आणि त्यानंतर प्रथम 1991 मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान देशात तीन सरन्यायाधीश झाले होते. सीजीआय रंगनाथ मिश्रा 24 नोव्हेंबर 1991 रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती कमल नारायण सिंह हे 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर म्हणजे एकूण 18 दिवस सरन्यायाधीश झाले. पुढे न्यायमूर्ती एम.एच.कानिया सरन्यायाधीश झाले आणि त्यांनी 13 डिसेंबर 1991 ते 17 नोव्हेंबर 1992 असे 11 महिने सर्वोच्च पद सांभाळले.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.