समान नागरी कायद्याला उद्धव ठाकरे गटाचं समर्थन, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

केंद्रातील भाजपा सरकार लवकरच समान नागरिक कायदा आणण्याच्या तयारीत आहे. अशातच यावर वादविवादही सुरु झाले आहेत. काही राजकीय पक्ष याला विरोध करत आहे तर, अनेक पक्ष याला समर्थनही करत आहे.

समान नागरी कायद्याला उद्धव ठाकरे गटाचं समर्थन, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 11:49 PM

मुंबई : स्वातंत्र्यापासूनच वादाचा मुद्दा असलेला समान नागरी कायदा कधी लागू होईल यावर जोरदार चर्चा सुरु आहे. संघ- भाजपाच्या एजेंड्यावर असलेले अनेक कायदे मोदी सरकारच्या काळात आणले गेले. भाजपाच्या वचननाम्यात असलेले कलम 370, राम मंदीर, ट्रिपल तलाक, असे एकेक वचन पूर्ण करत, आता समान नागरिक कायदा लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. 22 व्या कायदा आयोगाने यावर नागरिकांचे मत मागवली आहेत. मागच्या काही निवडणुंकाआधी प्रत्येक वेळा भाजपा कडून त्याच्या वचननाम्यात समान नागरी कायद्या आणण्याचे वजन दिलं जात आहे.

देशातील समान नागरी कायद्यावर जोरदार चर्चा सुरु असून अनेक पक्ष याला विरोध करत आहे. तर अनेक पक्ष याचे समर्थनही करत आहे, आता ठाकरे गटानेही याचे जोरदार समर्थन केले आहे.

जर संसदेत समान नागरिक कायद्याचे बिल आणले गेले, तर आम्ही त्याचे समर्थन करु, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नूसार, भाजपाला विरोध करणाऱ्या अनेक पक्षांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केले आहे. ठाकरे गट, आम आदमी पक्ष, वायएसआर काँग्रेस पक्ष, बीजेडी असे अनेक पक्ष समान नागरी कायद्याला समर्थन देण्याच्या तयारीत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच समान नागरी कायद्याचे समर्थन केलं आहे. ठाकरे गटासाठी हा भावनिक मुद्दा आहे. जर ठाकरे गटाने याचा विरोध केला तर ते हिंदुत्वापासून लांब गेल्याचा आरोप त्यांच्यावर होवू शकतो.

बाळासाहेब ठाकरे यांचे समान नागरी कायद्याबद्दल काय विचार होते?

बाळासाहेब ठाकरे यांचे तीन स्वप्न होते. ज्यात अयोध्या येथील राम मंदीर, काश्मीरमधून कलम 370 हटवने आणि देशात समान नागरी कायदा लागू करणे. उद्धव ठाकरे यांनी 20 जून रोजी पत्रकार परिषद घेवून समान नागरी कायद्याचे समर्थन केलं होतं.

खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य

खासदार संजय राऊत यांनी समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट आला नसून याबद्दल आत्ताच काही बोलणे चूकीचे ठरु शकते. ड्राफ्ट आल्यावर शिउबाठा आपली भूमिका स्पष्ट करेल, असे संजय राऊत म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.