विरोधी पक्षांची पुढची बैठक कुठं होणार?, उद्धव ठाकरे यांनी सांगितले, हुकुमशाही विरोधात लढण्याची घोषणा

ही लढाई कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही. ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आहे. देशातील लोकांचे स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे.

विरोधी पक्षांची पुढची बैठक कुठं होणार?, उद्धव ठाकरे यांनी सांगितले, हुकुमशाही विरोधात लढण्याची घोषणा
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 7:18 PM

बंगळुरू : देशातील २६ विरोधी पक्ष बंगळुरू येथे एकत्र आले. भाजप विरोधी या २६ पक्षांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असं नाव दिलं. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांनी इंडियाचा अर्थ सांगितला. त्यानंतर यावेळी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनीही संबोधित केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधी पक्षांची दुसरी यशस्वी बैठक झाली. हुकुमशाहीच्या विरोधात जनता एकत्र येत आहे. इंडिया असं नाव या एकत्रिकरणाला दिलं गेलं. ज्या देशासाठी आपण लढत आहेत. त्या नावाला घेऊनचं आपण समोर जाणार आहोत. यासाठीच आपण एकत्र आलो आहोत.

देश हेचं आमचं कुटुंब

राजकारणात वेगवेगळ्या विचारधारा असल्या पाहिजे. यालाच लोकशाही म्हणतो. ही लढाई फक्त आपल्या पक्षाची नाही. देश हा आमचं कुटुंब आहे. या देशाच्या कुटुंबासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. या कुटुंबाला आपल्याला वाचवायचं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आम्ही तुमच्यासोबत आहोत

ही लढाई कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही. ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आहे. देशातील लोकांचे स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. हे वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकांना विश्वास देतोय की, तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही आहोत. तु्म्ही चिंता करू नका. एक व्यक्ती किंवा पक्ष म्हणजे देश नव्हे. देश म्हणजे देशातील जनता होय. इंडिया म्हणून ते समोर येत आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढची बैठक आपण महाराष्ट्रात करू, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. बंगळुरू येथे मोदी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे बोलत होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.